डॉ. खत्री महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त रांगोळी महोत्सव

by : Priyanka Punvatkar

चंद्रपूर :  स्थानिक डॉ. खत्री महाविद्यालय, तुकूम चंद्रपूर दि. ०५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षक दिनाचे निमित्ताने महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी भव्य रांगोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. . कार्यक्रमाची सुरूवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या फोटोचा माल्यार्पण करून करण्यात आली. या स्पर्धेत कनिष्ठ व वरीष्ठ आणि पदव्युत्तर विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्यात ११० विद्याथ्यांनी विविध रांगोळ्या सादर केल्या.

महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी या रांगोळी महोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यामुळे या रांगोळी महोत्सवात फारच आशादायक वातावरण दिसून आले ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमात अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एम. काकडे, प्रमुख अतिथी म्हणुन संस्थेचे सचिव डॉ. एस.बी. कपूर, तसेच संस्थेच्या कोषाध्यक्षा प्रा. अनुश्री पाराशर सोबतच डॉ. शरयु कटकमवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होते. तसेच स्पर्धेकरिता छोटूभाई पटेल हायस्कुलचे शिक्षक श्री सुदर्शन बारापात्रे आणि सौ. स्नेहा धानोरकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. ही स्पर्धा सांस्कृतिक विभाग, संगणक विभाग व रसायनशास्त्र विभाग आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित करण्यात आली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *