लायन्स क्लब ऑफ उरणचे 51 व्या वर्षात पदार्पण.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे

 

उरण दि 29 जुलै लायन्स क्लब उरण चा 51 वा शपथविधी सोहळा भोईर गार्डन रेस्टॉरंट उरण येथे ला.सदानंद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली डिस्ट्रिक्ट 3231 A4 चे सेकंड व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन संजीव सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. डिस्ट्रिक्ट कॅबिनेट सेक्रेटरी लायन खेमंत टेलर इंडक्शन ऑफिसर म्हणून लाभले.

लायन संजीवजी यांच्या मंगलमय संकल्पनेतून — विठ्ठलाच्या नामस्मरणात, टाळांच्या गजरात, भक्तीमय वातावरणात, आराध्य दैवत श्री गणेशाच्या साक्षीने सर्व माजी अध्यक्ष यांनी अध्यक्षा ला. निलिमा नारखेडे यांच्यावर पुष्पवृष्टी करीत आपले आशीर्वाद उधळले. उपाध्यक्ष ला. ज्ञानेश्वर कोठावदे, द्वितीय उपाध्यक्ष ला. साहेबराव ओहोळ सचिव, ला. प्रकाश नाईक, खजिनदार ला.नरेंद्र ठाकूर , बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ला. चंद्रकांत ठक्कर, ला. सदानंद गायकवाड, ला. स्वप्ना गायकवाड, ला. डॉ. संतोष गाडे, ला. डॉ. प्रीती गाडे, ला. नवीन राजपाल तसेच ला. संदीप गायकवाड ला. प्रदीप थळी यांनी शपथ घेतली.लिओ क्लब ऑफ उरणच्या अध्यक्षा लिओ ग्रीष्मा रोहिथाक्षण, सचिव लिओ नेहाली चौलकर, खजिनदार लिओ नेत्रज ओहोळ आणि टीम यांनी शपथ घेतली.

लायन्स क्लब ची 50 वर्षाची उज्वल परंपरा कायम राखताना सर्व क्लब मेंबर्स आणि लिओ यांना सोबत घेऊन डिस्ट्रिक्टच्या अष्टसूत्रीवर काम करण्याचा मानस अध्यक्षा ला. निलिमा यांनी व्यक्त केला.

उपाध्यक्ष ला. ज्ञानेश्वर कोठावदे यांनी एन आय हायस्कूल उरणच्या पाच गरीब विद्यार्थ्यांच्या फीचा रुपये 7750/- चा धनादेश दिला. डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन ट्विंनिंग ला. विजय गणात्रा यांच्यातर्फे आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर आणि वह्यांचे वाटप करण्यात आले. ला. स्वप्ना सदानंद गायकवाड यांनी फुटबॉल क्लब ऑफ उरण यांना रुपये 5000/- चा धनादेश दिला.

डिस्ट्रिक्टमधून आलेले विविध पदाधिकारी ला. मिलिंद पाटील, ला. नयन कवळे, ला. प्रवीण सरनाईक, ला. नितीन अधिकारी, ला. अनिल म्हात्रे, ला. अनुप थरवानी, ला. रमाकांत म्हात्रे यांच्या उपस्थितीने सोहळा अजूनच रंगला.तसेच उरण क्लबचे ला. प्रमिला गाडे, ला. अवनी सरवैय्या, ला. संध्याराणी ओहोळ, ला. मनीष घरत, ला. नाहीदा ठाकूर, ला. राजश्री रुईकर, ला. किरण बाबरे, ला. अक्षता गायकवाड, ला. ॲड. जागृती गायकवाड, ला. सिद्धेश गायकवाड, लिओ श्रेयस रुईकर आणि लिओ क्लबच्या उपस्थितीने वातावरण फुलले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *