29 जुलै रोजी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे 11 वे महाराष्ट्र राज्यस्तरीय अधिवेशन पुणे येथे आयोजन…!*

 

लोकदर्शन 👉 किरण कांबळे

*भारतीय विद्यार्थी मोर्चा हे गैराजनितिक संघटन असुन बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या हक्क अधिकारासाठी स्थापन केलेले संघटन आहे भारतीय विद्यार्थी मोर्चा हे राष्ट्रव्यापी संघटन आहे! भारतीय विद्यार्थी मोर्चा यंदा 13 व्या वर्षात पदार्पण करत आहे!भारतीय विद्यार्थी मोर्चाची स्थापना 11 एप्रिल 2011 रोजी सत्यशोधक महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आली असून! भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून शिव फुले शाहू आंबेडकर आण्णा भाऊ साठे समस्त बहुजन समाजातील महापुरुषांचे चळवळ चालवण्याचे काम करत आहे ! आणि बहुजन समाजातील दिशाहिन झालेल्या विद्यार्थ्यांना योग्य दिशेला आणण्याचे काम भारतीय विद्यार्थी मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रात करत आहे ! भारतीय विद्यार्थी मोर्चा, भारतीय युवा मोर्चा, भारतीय बेरोजगार मोर्चा, भारतीय विद्यार्थी छात्रा प्रकोष्ठ, भारतीय विद्यार्थी छात्रावास संघ, राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ, इंडियन रिसर्च स्काॅलर्स असोसिएशन संयुक्त 11वे महाराष्ट्र राज्यस्तरीय अधिवेशन दि.29 जुलै 2023 रोजी सकाळी 11ते 5 शनिवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन पुणे येथे आयोजित केलेले आहे! अधिवेशनाचे उद्घाटक :- मा.डाॅ.प्रफुल्ल पवार सर (कुलसचिव,सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे) हे असणार आहेत! अधिवेशनाची अध्यक्षता :- मा.सिध्दांत मौर्या सर (राष्ट्रीय प्रभारी भारतीय विद्यार्थी मोर्चा नई दिल्ली) हे करणार आहेत! प्रमुख उपस्थिती:- मा.डाॅ.रावसाहेब लटपटे सर (अध्यक्ष प्रोटाॅन, सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठ पुणे) मा.ऍड राहुल मखरे सर (राष्ट्रीय महासचिव बहुजन मुक्ती पार्टी नवी दिल्ली) मा.अजिंक्य चांदणे सर (प्रदेशाध्यक्ष डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य) मा.प्रा.विक्रम कदम (सुप्रसिद्ध शिवव्याख्याते सातारा) मा.प्रा.केशव पवार सर (लेफ्टनंट एन.सी.सी.विभाग प्रमुख छत्रपती शिवाजी महाविद्यालय सातारा) मा.प्रा.दिपक वासनिक सर (राज्य प्रभारी भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश) प्रमुख मार्गदर्शक :- मा.सचिन बनसोडे सर (राज्य कार्याध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश) मा.महेश बडे सर (एमपीएससी विद्यार्थी आंदोलन नेता पुणे) मा.ऍड सिध्दार्थ इंगळे सर (संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र स्टुडंट युनियन महाराष्ट्र) मा.दादाराव नांगरे सर (संस्थापक अध्यक्ष नॅशनल स्टुडंट युनियन महाराष्ट्र) मा.अनिकेत मोरे सर (माजी मुख्यमंत्री यिन महाराष्ट्र राज्य) हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती भारतीय विद्यार्थी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ऍड किरण कांबळे सर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली! भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या अधिवेशननात बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या ज्वलंत प्रश्नांनावर विचारमंथन केले जाणार आहे तरी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या अधिवेशननात सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय विद्यार्थी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ऍड किरण कांबळे सर यांनी केले!*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *