बांबु कार्यशाळेसाठी मंत्री जयंतराव पाटील सोमवारी आटपाडीत येणार !.

लोकदर्शन आटपाडी 👉 (प्रतिनिधी दि . २१

आटपाडीत सोमवार दि . २५ रोजी बांबु लागवड व बांबु मिशन कार्यशाळा संपन्न होत असून बांबु लागवडीसाठी हेक्टरी ३ लाख ७१ हजार रुपये शासकीय अनुदान मिळणार असल्याची माहिती या कार्यशाळेचे निमंत्रक आनंदरावबापू पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली .
आटपाडी येथील जवळे मल्टीपर्पज हॉल येथे सकाळी १०.३० वाजता होत असलेल्या या कार्यशाळेचे उद्‌घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ . अभिजित चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि खानापूर आटपाडीचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या अध्यक्षते खाली ही कार्यशाळा संपन्न होत आहे .
बांबू कार्यशाळेत मनोजकुमार वेताळ, विलास काळे, विजय माने, अजित भोसले या अधिकारी महोदयांचे, तसेच कैलास नागे, गणेश शिंदे, अरविंद कल्याणकर, विनोद पाटील या व्यावसायीक आणि यशस्वी शेतकर्‍यांचे मार्गदर्शन होणार आहे.
या बांबू कार्यशाळेत आटपाडी तालुक्याचे सामाजीक नेते भारततात्या पाटील, ह.भ.प . बबनबापू क्षिरसागर करगणी, सादिक खाटीक आटपाडी , मनोहर विभूते माडगुळे , संपतराव पाटील गोमेवाडी, शशिकांत भोसले नेलकरंजी , गजानन गायकवाड चिंचाळे, विजयराव पुजारी खरसुंडी यांची उपस्थिती राहणार आहे .
डाळींब क्रांती नंतरच्या, बांबु लागवडीच्या नवक्रांती साठी हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे . असे आवाहन आनंदरावबापू पाटील यांनी केले .
दगडी कोळशाइतका उष्णतेचा उष्मांक बांबुचा असल्याने आणि बांबुचे अनेक ठिकाणी उपयोग होत असल्याने बांबुला मोठा दर मिळत आहे आणि मोठी मागणीही आहे . कोणत्याही प्रकारच्या जमिनीत येणारे बांबू ३ वर्षानंतर विक्रीस उपलब्ध होत आहेत . प्रति वर्षी, प्रति एकर मोठे उत्पन्न येणाऱ्या बांबु उत्पादनास फारसे यातायात करावे लागत नाही . बांबूपासून कागद,प्लायवुड, इथेनॉल, वगैरे च्या निर्मिती बरोबरच इंधनासाठी बांबुचा उपयोग होत आहे . बांबुची राख ही उपयोगी ठरत असल्याने आणि मोठ्या प्रमाणावर ऑक्सीजन निर्मितीस बांबु पिक कारणीभूत ठरत असल्याने बांबु शेतकर्‍यांना वरदान ठरत आहे. बहु उपयोगी आणि मोठ्या फायद्याच्या बांबुची परिपूर्ण माहीती घेण्यासाठी शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने या कार्यशाळेस यावे. असे आवाहनही आनंदराव बापू पाटील यांनी केले आहे .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *