सेनापती बापट मार्ग, दादर येथे अनधिकृत रित्या सरास घाऊक मासळी बाजार कायदेशीर बंद करण्याबाबत मुख्यमंत्री यांना पत्र.*

लोकदर्शन मुंबई प्रतिनीधी:👉 महेश कदम

प्रभादेवी, एल्फिन्स्टन रोड येथील
मच्छी मार्केटला अस्वच्छतेचा विळखा पसरलेले असतो. या बाबत अनेक तक्रारी करून सुद्धा जैसे तैसे आहे. या अगोदर सुद्धा प्रसार माध्यमातून बातमी करण्यात आली होती थोडे दिवस शांतमय होऊन पुन्हा तेच वातावरण. पालिका अधिकारी साफ सफाई करून सुद्धा अस्वच्छता, घाण दुर्गंधी पसरलेली असते, प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिकांच्या समस्या कायम आहे. गेली २० वर्ष हे त्रास लोकांना सहन करावे लागत आहे. कागदीपत्र कारवाई करून सुद्धा मच्छी मार्केट स्थलांतर होत नाही. स्थानिक नगरसेवक ह्यांनी सुद्धा कारवाई करून प्रशासन दिशाभूल करते. आंध्रप्रदेश मधुन विक्री साठी येणारे मासे हिथे रस्त्यावर काटा लावून सरस विकले जातात. मच्छीच्या घाण पाण्याने मलेरिया, डेंग्यू सारखे आजाराचे नाहक बळी गेले आहेत. टेम्पो, ट्रक, डबल पार्किंग मुळे वाहतूक कोंडी व अपघात होऊन सुध्दा ह्यांच्यावर पोलीस कारवाई होत नाहीत. स्वच्छ भारत अभियान च्या नावाखाली अस्वच्छता दिसते. स्वराज्य सोसायटी, हनुमान नगर, आंबेडकर नगर, ह्यांना अनेक त्रास सहन करावे लागते. ह्या संदर्भात श्री. जितेंद्र कांबळे, वडाळा विधानसभा उपाध्यक्ष ह्यांनी माननीय मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री साहेब व बृहन्मुंबई महानगर पालिका यांना निवेदन पत्र दिले आहेत तर त्यांनी पहाटे सकाळी लवकर येऊन येथे लक्ष द्यावे व ह्यांच्यावर बेकायदेशीर धंधा करणाऱ्यावर कारवाई करून मच्छी मार्केट स्थलांतर करावे अशी मागणी स्थानिक लोकांनी केली आहे. नाहीतर आंदोलन करण्यात येईल असे आव्हान केले आहे.

सेनापती बापट मार्ग, दादर येथील प्रभाग क्र १९२ मधील घाऊक मासळी बाजार सन २०२० साली ऐरोली येथे कायदेशीर प्रक्रियेने मनपा मार्फत स्थलांतरित होऊन सुद्धा त्या घाऊक मासळी बाजार रितसर चालू आहे. सदर मासळी बाजारावर सहाय्यक आयुक्त,जी/उत्तर यांच्या मार्फत कायदेशीर कारवाई करून सदर ठिकाणी पत्रे लावून जागा सील बंद करण्यात आली आहे. परंतु काही बाहेरचे मासळी व्यापारी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, सेनापती बापट मार्ग येथील ब्रिज शेजारी रस्त्यावर खुलेआम काटा लावून मासळीचा व्यापार करत आहे. जेम तेम ४-५ मराठी माणूस तेथे धंधा करतो बाकीचे सर्व बाहेरचे येथे येऊन मच्छी चा व्यापार करतात. मासळीचे ट्रक, टेम्पो, टॅक्सी यांची तीन लेन मध्ये लावून रस्त्याच्या दुतारफा घेवाण देवाण चालू असते. विभागातील रहिवाशी जेष्ठ नागरिक, सकाळी शालेय विध्यार्त्यांना, महिलांना जाण्या येणास जागा नसते, अंगावर मच्छी चा पाणी पडते त्यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे सोबत घाण दुर्गंधीयुक्त पाणी व मासळीचे थर्माकोल चे बॉक्स चा खच रस्त्यावरच पडलेला असतो. याच्यामुळे सदर परिसरात मोटार सायकल घसरून अपघाताचे प्रकार दिवसेंदिवस वाढले आहेत. सदर मासळी बाजाराच्या वेळेत स्वराज्य सोसायटी, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ते आंबेडकर नगर इथपर्यंत पार्किंग मुळे सदरचा रस्ता घोक्याचा झाला आहे. सदर पत्रानुसार नागरिकांच्या जीवाचा घोका लक्षात घेऊन अनधिकृत मासळी बाजार कायदेशीर कारवाई करून बंद करून विभागातील जेष्ठ नागरिक, शालेय विध्यार्थी व महिला यांना न्याय द्याल व वाहतूक कोंडी मुक्त करून द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे.
अन्यथा स्थानिक नागरिकांच्या रोष्याला सामोरे जाऊन कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास याची संपूर्ण जबाबदार म न पा आयुक्त असतील असा ईशारा स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *