मधुंगधा जुलमे चा इन्फंट कॉन्व्हेंट च्या वतीने सत्कार.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– इन्‍फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित, इन्फंट् जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे शिक्षक आणि पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात एमपीएससी परीक्षेत एससी कॅटेगरी मधून महाराष्ट्रात प्रथम आलेल्या इन्फंट कॉन्व्हेंट ची माजी विध्यार्थीनी कू.मधुंगधा जुलमे हीचा संस्थेचे संचालक अभिजीत धोटे यांच्या हस्ते शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सिल्वर झोन नवी दिल्ली, सायन्स ऑलिंपिड नवी दिल्ली, जिओ जीनियस कोटा राजस्थान, या परीक्षेत इन्फंट च्या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळविले या सर्व विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र आणि सुवर्ण पदक देऊन सन्मान करण्यात आले.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थिती होते. कार्यक्रमाचे संचालन दीपक खाडे यांनी तर आभार प्रदर्शन हर्षा बर्डे यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *