शरदराव पवार महाविद्यालयाचे विद्यार्थी कबड्डी खेळात चमकले*

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
चौधरी देवीलाल विद्यापीठ सिरसा हरियाणा ,येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठ सर्कल कबड्डी स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या संघात शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर येथील प्रलय शेरकी व प्रलय पेन्दोर या दोन विद्यार्थ्यांचा कबड्डी संघात सहभाग होता. अनेक विद्यापीठ संघांना कडवी झुंज देऊन, गोंडवाना विद्यापीठ कबड्डी संघाने चौथे स्थान प्राप्त केले. त्यांच्या या घवघवीत यशाकरिता शरदराव पवार महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर चे अध्यक्ष श्री. आनंदराव अडबाले यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना उज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना या क्रीडा स्पर्धेत यश मिळण्याकरिता महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा प्रमुख डॉ. सत्येंद्र बलवंत सिंह यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या खेळाडू विद्यार्थ्यांच्या चमकदार कामगिरी करिता शरदराव पवार महाविद्यालयाचे प्राचार्य,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून ,पुढे होणाऱ्या खेळाकरिता शुभेच्छा दिल्यात,
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *