Home
Home Breaking News अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर द्वारे बाखर्डी गावांत RCC कलवर्ट चे भूमिपूजन

अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर द्वारे बाखर्डी गावांत RCC कलवर्ट चे भूमिपूजन

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर च्या वतीने बाखर्डी येथील ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या मागणीला प्राधान्य देत शेतीमध्ये ये-जा करणाऱ्या नाल्यावरील RCC बॅाक्स कलवर्ट चे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे प्रशासन व कर्मचारी संबंध विभागा चे प्रमुख श्री. नारायणदत्त तिवारी यांच्या मार्गदर्शनात व सी.एस.आर. प्रमुख श्री. प्रतीक वानखेडे, अंजली त्रिपाठी व बाखर्डी ग्रामपंचायत चे सरपंच श्री. अरूण रागीट, उपसरपंच श्रीमती वैशाली प्रमोद गानफाडे, सदस्य सुभाष ताजने, प्रकाश खुसपुरे, रवी कुंभारे, अमृता बुचूंडे, रिना पेंदोर व गावातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. सदर काम अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या सी.एस.आर निधीतून मंजूर करण्यात आले असून त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना पावसाळयात नाला ओलांडुन शेतात जाण्यास सोय होणार आहेत,

हा कार्यक्रम यशस्वीतेकरीता सचिन गोवारदिपे, संजय ठाकरे व देविदास मांदाळे यांचे सहकार्य लाभले.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here