चक्क शेतकऱ्यांच्या रस्त्यांवरची रेती चोरीला. नाल्यातील रेती तस्करांवर वेसन घाला अन्यथा आंदोलन जण .रेती उपस्यामुळे शेतकरी त्रस्त

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना
कोरपणा शहराजवळील तलाव लगत असलेल्या नाल्या वरती अवैधरित्या शेतकऱ्यांच्या शेतात जाण्या येण्याच्या मार्गावरील रोज पहाटे चार ते पाच ट्रॅक्टर सर्रास रेती उत्खनन करीत आहे यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये बैलबंडी घेऊन जाणे अवघड होत आहे गावाच्या हाके वरती असलेल्या या नाल्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत असताना सुद्धा संबंधित विभाग गाढ झोपेत असल्याचे दिसते
सध्या कोरपना रेती तस्करांना सुगीचे दिवस आले आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे रेती चोरीला उधाण आले आहे. दरम्यान तलाव जवळ असलेल्या नाल्यातून रेती तस्करांनी धुडगूस घातला आहे. तसेच झाडे यांच्या शेतापासून तर चक्क ईटणकर यांच्या शेतापर्यंत पूर्ण नाल्यातील रेती तस्करांनी अवैध उत्खनन करुन नेली आहे मात्र दिवस-रात्र सुरू असलेल्या या गावाजवडील नाल्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत असताना सुद्धा संबंधित विभागाला माहित होत नाही हा मात्र संशोधनाचा विषय आहे शहराजवळील ही परिस्थिती असेल तर बाकी ठिकाणाची काय यांच्यावरून लक्षात येते हा नाला रेती तस्करांसाठी वरदान ठरत आहे. या रेतीच्या चोरट्या वाहतूकीमुळे शासनाला मात्र लाखोंच्या महसुलावर पाणी फेरावे लागत आहे. ….नुकत्याच पडलेल्या धुवांधार पावसामुळे तालुक्यातील बहुतेक नाले रेतीने तुडुंब भरले आहे.काही नाले जंगलातून येत असल्याने या नाल्यात बारीक रेतीचा साठा जमा झाला आहे. नाल्यावर रेती तस्करांची वक्रदृष्टी पडली आहे.या नाल्यातून रेतीचा अवाढव्य उपसा करण्यात येत आहे.
नाल्यात रेती तस्करांनी हल्ला बोल केला आहे.नाल्यात मोठमोठे खड्डे खोदून रेतीची उचल केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये जाणे तारावरची कसरत ठरत आहे आता या चोट्यांना रस्त्याच्या वरची रीती कमी जात असल्याने आता शेतकऱ्यांनी जावे तरी कसा असा प्रश्न शेतकऱ्यापुढे निर्माण होत आहे या अवैध रेती तस्कर ट्रॅक्टर धारकावर त्वरित कारवाई करावी अन्यथा याविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा या परिसरातील शेतकरी विनोद ईटनकर,मसुद पटेल,अह अली बालाजी म्हसे,दादामिया,दिलीप ईटनकर यांनी दिला आहे
या नाल्यातून रेतीचा अवाढव्य उपसा करण्यात येत असल्याने नाल्याच्या अस्तित्वावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन्ही नाले पोखऱण्याचा घाट घातल्या जात असतांना सुध्दा महसूल कर्मचारी मात्र याकडे कानाडोळा करीत असल्याने संशय बळावला आहे.
रेती तस्करीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.नाले रेतीशिवाय कोरडे पडण्याची भीती असल्याने भविष्यात शेतशिवारात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. आता याच रेती वाहतुकीमुळे शासनाला देखील लाखोंच्या महसुलावर पाणी फेरावे लागत आहे.

मागे झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती याचा फटका याच नालाशेजारी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात झाला होता
आणि शेतात असलेले पिके पूर्णपणे नष्ट झाली होती या अगोदरची मुळे होणारा शासनाचा व शेतकऱ्यांचा नुकसान थांबावा अशी मागणी शेतकरी करीत आहे

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *