अक्षरा सामजिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र बाजारपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने “उत्सव माऊलींचा” हा कार्यक्रम संपन्न. .!

!

लोकदर्शन मुंबई-घाटकोपर 👉-महेश्वर तेटांबे)

अक्षरा सामजिक प्रतिष्ठान संस्था मागील १४ वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करीत आहे. संस्थेमार्फत गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत तसेच महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. जुने वर्ष संपून येणाऱ्या नवीन वर्षासाठी मनामध्ये नवीन उभारी, नवा निश्चय, नवी प्रेरणा घेण्यासाठी व महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी, स्वतःसाठी थोडा वेळ देण्यासाठी, महाराष्ट्र बाजारपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने घाटकोपर येथे नुकताच “उत्सव माऊलींचा” हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास समाजातील सर्व स्तरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपविभाग संघटिका सौ.चारुशीला चव्हाण, समाजसेविका सौ.प्रतिभा राणे, उप शाखा संघटिका सौ. श्वेता कणसे, उप शाखासंघटिका सौ. स्मिता दवंडे यांनी खूप मेहनत घेतली. कार्यक्रमास विजेत्या स्पर्धकांना महाराष्ट्र बाजारपेठ तर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या शेवटी अक्षरा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.अमोल वंजारे यांनी अक्षरा चे पदाधिकारी, महाराष्ट्र बाजारपेठ चे संस्थापक अध्यक्ष श्री. कौतुक दांडगे साहेब, उपस्थित महिला वर्ग, व स्थानिक रहिवासी यांचे आभार व्यक्त केले. व विजेत्या महिला स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *