लोकदर्शन 👉राहुल खरात
साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण व समाजकारण या क्षेत्रात गेल्या दहावर्षांपासून काम करणाऱ्या *वाचनकट्टा बहूउद्देशीय संस्था, काेल्हापूर* तर्फे सन २०२३ पासून _*वाचनकट्टा साहित्य पुरस्कार*_ देण्यात येणार आहेत. अशा या विविध पुरस्कारांसाठी प्रवेशिका मागविण्याच्या संदर्भात जाहीर आवाहन करण्यात येत आहे.
या पुरस्कारासाठी जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत निर्मित ग्रंथ/पुस्तके ग्राह्य असतील.
*ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे साहित्यिक पुरस्कार* यासाठी प्रवेशिका मागविण्यात येणार नाही. त्यासंदर्भात निवड प्रक्रिया वाचनकट्टा निवड समिती करेल.
पुरस्कार दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस घोषित करण्यात येतील व एप्रिल महिन्यात समारंभपूर्वक पुरस्कार वितरण सुद्धा करण्यात येईल.
पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, मानपत्र/सन्मानचिन्ह व पुस्तके/रक्कम असे असेल.
कविता, कथा, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, गाैरवग्रंथ, समीक्षा व वैचारिक लेखन, दिवाळी अंक यासाठी प्रवेशिका पाठविण्यासाठीची अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०२३ ही आहे.
पुरस्कार :
√ *उत्कृष्ट गद्य साहित्य पुरस्कार*
√ *उत्कृष्ट पद्य साहित्य पुरस्कार*
√ *उत्कृष्ट संकीर्ण साहित्य पुरस्कार*
√ *उत्कृष्ट संशोधन साहित्य पुरस्कार*
यासाठी खालील पत्त्यावर प्रवेशिका पाठवाव्यात असे आव्हान वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेकडून करण्यात आले आहे.
*पत्ता*
*वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था, काेल्हापूर*
फ्लॅट नं. ३, आनंदी-विजय अपार्टमेंट, माऊली चाैक, राजारामपुरी १३वी गल्ली, देसाई किराणा स्टोअर्स समोर, कोल्हापूर – ४१६ ००८ संपर्क नं – 9422138237
www.vachankatta.com
(कार्यालयाला येताना फाेन करूनच यावे)
*काही सूचना*
१) कविता, कथा, कादंबरी, आत्मचरित्र, गाैरवग्रंथ, समीक्षा व वैचारिक लेखन, दिवाळी अंक याकरिताच प्रवेशिका स्वीकारल्या जातील.
२) प्रवेशिका महाराष्ट्रातील व बृहन्महाराष्ट्रातील लेखकांसाठी खुली असेल.
३) पुस्तकाच्या दोन प्रती शक्यतोवर पोस्टाने (स्पीड पोस्ट) पाठवाव्यात.
४) सोबत लेखकाचा अल्प परिचय व दोन पासपोर्ट साईझ फोटो पाठवावे.
५) पुरस्कारासाठी पुस्तकाची प्रथम आवृत्ती ग्राह्य धरण्यात येईल.
६) ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे साहित्यिक पुरस्कार यासाठी प्रवेशिका मागविण्यात येणार नाही. त्यासंदर्भात निवड प्रक्रिया वाचनकट्टा निवड समिती करेल.
७) इतर साहित्य प्रकारातील प्रवेशिका ३० जानेवारी २०२३ पर्यंत दिलेल्या पत्त्यावर पोहचणे आवश्यक आहे.
८) पुरस्कार घोषित झाल्यावर त्याची बातमी facebook page- https://www.facebook.com/vachankattakolhapur?mibextid=ZbWKwL
द्वारे समाज माध्यमातून प्रकाशित करण्यात येईल.
९) ही पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सहकार्य करावे.
_*टीप- प्रवेशिका विनामूल्य असून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.*_