



By : Ajay Gayakwad
वाशिम
मालेगाव : शहरातील मेहकर रोडवरील गाडगेबाबा नगर मध्ये वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी कॉलनीतील रहिवाशांनी ता.20 रोजी साजरी केली. यावेळी सकाळीच गाडगेबाबांच्या तैलचित्राच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली व कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक अरुण बळी, रामेश्वर जगताप यांनी गाडगेबाबाच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण केले. प्रा.पी.एस.खिराडे यांनी गाडगेबाबानी केलेल्या कार्याची सखोल माहिती दिली.त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी गाडगेबाबा नगर मधील ज्येष्ठ नागरिक अरुण बळी, संतोष भालेराव, डॉ.विजय नवघरे, रितेश जगताप, गणेश गोरे,अजय इंगोले,किशोर चाफे,प्रा.किसन राठोड, पोलीस कर्मचारी भालेराव,नितीन घुगे,गोपाल राठोड,योगेश जहिरव, गजानन नवले,गजानन घुगे,खरात साहेब,एडवोकेट भगत, आदी मान्यवर उपस्थित होते.