विकास विद्यालय पवनी येथील विद्यार्थ्यांचे क्रीडाक्षेत्रात नैपुण्य

लोकदर्शन पवनी 👉 अशोक गिरी

पवनी/भंडारा (दि.९ क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर विविध प्रकारच्या क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.यामध्ये जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत किक बॉक्सिंग स्पर्धेत विकास विद्यालय पवनी येथील इयत्ता नववीची विद्यार्थिनी चेतना राजू बावनकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला असून तिची निवड विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी झालेली आहे. त्याचप्रमाणे तालुका स्तरीय कराटे स्पर्धेत देखील प्रथम क्रमांकाने विजयी झाली असून तिची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झालेली आहे. तसेच संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयाच्या प्रांगणात विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी चेतना राजू बावनकर हिची विभागीय व जिल्हास्तरावर निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष धनराज मुंडले,उपाध्यक्ष पुरुषोत्तम कटेखाये, शाळेचे मुख्याध्यापक संजय गभणे यांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सदर यशाबद्दल विद्यार्थिनीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.ती आपल्या यशाचे श्रेय आईवडील, संस्थासचिव, संस्थाअध्यक्ष, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, इतर सर्व कर्मचारी यांना देते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here