, ए आय एम आय एम कार्यकर्त्यांचा पोहचला नगरपरिषदेवर धडक मोर्चा.

 

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर या औद्योगिक शहर असलेल्या शहरातील मेश्राम ले आउट पिंपळगाव रोड येथील वार्डातील असुविधा, अधुरे रोड ,नाली,रिकाम्या प्लॉट वर जमा पानी ,घरात जायला रस्ता नाही ,अश्या लोकांच्या समस्या घेऊन मेश्राम वॉर्डा तील महिलांना घेऊन मजलिस चे कार्यकर्ते यांनी नगराध्यक्ष, व नगरसेवक याना निवेदन दिले व वार्डातील समस्या लवकर निकाली काढण्यास सागितले मागील वर्षी पासून ह्या समस्या असून कोणीही लक्ष द्यायला तयार नसल्याने महिलामध्ये तीव्र नाराजी दिसून आली,त्यांनी आपल्या भावना नगराध्यक्ष,नगरसेवक समोर मांडल्या नगरसेवक त्या वार्डत येऊन पहात नाही अशी तक्रार महिलांनी केली येथील नगरसेवक विरोधी पक्षा चा भाजप चा असल्याने नगराध्यक्ष यांनी त्या नगरसेवकाला या भागात लक्ष देण्याची तंबी दिली . व येत्या दोन चार दिवसात नाली,रोड चे काम सुरू होईल व जेथे पानी जमा आहे तिथे मुरूम टाकल्या जाईल असे आश्वासन उपस्थिताना दिले. यावेळी वार्डातील सविता उराडे,सुषमा बोरकर,रमा धोंगळे,जीवन माला जागलेकर,सुरेखा बोरकर,वैशाली सोंकामडे,अर्चना बुटले,वैशाली उपाध्ये,मंजू बाई काबले,संगीता लोणकर व ए आया एम आय एम मजलिस चे रफिक शेख,शेख रऊफ भाई, मैनू बेग, तोसिफ अली,शेख युसुफ , अतहर शहा,अफरोज शेख सह अन्य कार्यकर्ते हजर होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *