‘एक गाव एक वाचनालय’उपक्रमासाठी पुस्तके दान करण्याचे आवाहन

 

लोकदर्शन👉राहुल खरात

राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागात वाचन चळवळ राबविणाऱ्या युवकमित्र परीवार या संस्थेमार्फत पुणे व पिंपरी चिंचवड शहरात वाचन प्रेरणा दिनानिमित्त महिनाभर जुने नवे पुस्तके संकलन मोहीम राबविण्यात येत असू नागरिकांनी जुनी,नवी वाचून झालेली पुस्तके दान करावीत असे आवाहन करण्यात येत आहे.डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती ‘वाचन प्रेरणा दिनापर्यंत मोहीम चालू राहणार असून नागरिकांनी 9529125396 या क्रमांकावर संपर्क करून नाव नोंदणी करावी.चळवळीचे स्वयंसेवक दिलेल्या पत्त्यावर येऊन पुस्तके संकलित करतील.
गेल्या वर्षी पुणेकरांनी तब्बल दहा हजार पुस्तके दान केली असून राज्यातील ग्रामीण भागातील सत्तर गरजू वाचनालयांना ही पुस्तके भेट देण्यात आली.लेखक,साहित्यिक व जास्तीत जास्त नागरिकांनी त्यांच्याकडील अवांतर वाचनाची जुनी, नवी पुस्तके चळवळीला दान करण्याचे आवाहन प्रवीण महाजन यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here