जिवती तालुक्यातील बंजारा समाजाच्या युवकांनी दिली नागपूर येथील आधुनिक परसबागेला भेट.*

 

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
श्रीपत राठोड दाम्पत्याने नागपूर येथे तयार केली चवथ्या मजल्यावर परसबाग
,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,
चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदूर्गम जिवती तालुक्यातील वेगळे विदर्भ राज्य आणि अनेक समस्यांसाठी सतत धडपडणारे व संघर्ष करणारे विदर्भराज्य आंदोलन समितीचे चंद्रपूर,गडचिरोली व गोंदिया विभाग प्रमुख सामाजिक कार्यकर्ते प्रा.सुदाम राठोड यांच्यासह बंजारा समाजाच्या युवकांनी नागपूर येथील मनिषनगर स्थित श्रीपतभाऊ राठोड व सौ. जयश्रीताई राठोड यांनी साकारलेल्या चौथ्या मजल्यावरील महानायक वसंतराव नाईक यांच्या नावाने साकारलेल्या आरोग्यदायी परसबागेला भेट देण्यात आली. अनेक प्रकारच्या गुलाब फुलांसह,आरोग्यदायी विविध वनस्पती,वांगी,भेंडी,कारली, दोडकी,भेंडी,टमाटर,पालक,मिरची इत्यादी नित्य उपयोगी भाजीपाल्यासह लिंबू,पेरू, आंबा,कडीपत्ता पाहून सर्व युवक मंत्रमुग्ध झाले. शिवाय चार लोकांचे फिरायाचे ट्रक, सूर्यस्नानाची जागा,अॅक्युप्रेशर पांईट,छोटेखानी बैठकीचे व्यवस्थापन, संत सेवालाल महाराज क्रांतीसाधना केंद्र इत्यादी प्रेरणादायी आणि दिशादर्शी असल्याचे प्रकर्षाने सर्वांनी प्रतिपादन केले. शिवाय “आरोग्यादायी परीवारासोबत आरोग्यसंपन्न राष्ट्रनिर्मितीसाठी जैविकशेती.,, या विषयावरील माहीतीपूर्ण अनुभवसिद्ध अप्रतिम प्रभावी आणि परिणामकारक सादरीकरण कु.दिपाली राठोड व कु. अंजली राठोड यांनी करून सर्वांची मने जिंकली हे विशेष उल्लेखनिय आहे. त्याचप्रमाणे सौ.जयश्रीताई राठोड यांनी सुद्धा नागपूर सारख्या शहरात राहून बंजारा संस्कृतीचे भरतकाम कलेचे कला व कौशल्यपूर्ण करून गोरमाटी कलेचे केलेले संवर्धन हे सर्वांच्या आकषणाचे केंद्र बनले शिवाय त्यांच्या सुमधुर आवाजातील बंजारा समाजाच्या ज्वलंत समस्यांवरील स्वलिखित गीत गायनांने प्रत्येकांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडले. विशेष म्हणने परसबागेची निर्मिती टाकावू पासून टिकावू आणि उपयोगी केलेली असून शेणखत व जैविक प्रॉडक्टच्या वापरांनी केल्यामुळे नागपूर सारख्या सिमेंटच्या जंगलातील तेही थेट चौथ्या मजल्यावर साकारलेली परसबाग सर्वासाठी प्रेरणादायी व दिशादर्शी असल्याचे स्वंयस्फूर्तपणे जाणवते एवढे मात्र निश्चित आहे.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here