अवकाळी पाऊस

 

लोकदर्शन👉सौ भारती वसंत वाघमारे
मंचर
ता आंबेगाव
जि पुणे

दिनांक १०/९ /२०२२

अवकाळी पाऊस
कधीही पडतो
मायबाप शेतकरी
कर्जात बुडतो

गहाण ठेवून आईला
बी बियाणे आणले
काम करते कारभारीन
पाळण्यात रडते तानुले

सभोवार दाट धुक्यांची
वसुंधरेन पांघरली चादर
पिक गेली करपून
बळीराजाला गोड लागे ना भाकर.

गार गार थंडीत
धुक पांढरे पडलं
या अवकाळी पावसान
तोंडचे पाणी पळालं

अरे पावसा पावसा
थांब आता येऊ नको
पिक गेल भिजून
जिव आमचा घेऊ नको.

सौ भारती वसंत वाघमारे
मंचर
ता आंबेगाव
जि पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here