आमदार सुभाष धोटेंनी केली विसर्जन स्थळाची पाहणी : सुविधांचा घेतला आढावा. गणरायांचे दर्शन घेऊन राजुऱ्यातील जनतेशी साधला

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा (ता.प्र) :– कोरोणा विषानुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील दोन वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध होते मात्र या वर्षी कोरोनाची दहशत संपल्यामुळे मोठय़ा उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. या पार्श्‍वभूमीवर लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी आज राजुरा शहरातील गणेश विसर्जन स्थळाची पाहणी करून येथे स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला. विसर्जनाच्या वेळी गणेश भक्तांना कोणत्याही असुविधा होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्याव्यात अशा सुचना अधिकाऱ्यांना दिल्यात. गणेश विसर्जन सुस्थितीत पार पाडण्यासाठी शहरातील सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे व प्रशासनाने सुद्धा नागरिकांशी स्नेहबंध जपत गुण्यागोविंदाने हसत खेळत गणपती बाप्पाचा निरोप घ्यावा असे आवाहन केले. तसेच काल सायंकाळी शहरातील विविध भागातील गणेश मंडळांना भेटी देऊन गणरायाचे दर्शन घेतले. अनेक ठिकाणी बाप्पा च्या आरतीत स्वतः सहभाग घेतला. क्षेत्रातील जनतेच्या सुखासाठी साकडे घातले. गणेश मंडळ सदस्य, जेष्ठ नागरिक, व्यापारी, महिला, युवक यासह जनतेशी संवाद साधत ख्यालीखुशाली जानून घेतली.
या प्रसंगी राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, तहसिलदार हरीश गाडे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे, माजी उपनराध्यक्ष सुनिल देशपांडे, अशोकराव देशपांडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे, ओबीसी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, सं गां नि योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, अल्पसंख्यक काँग्रेस अध्यक्ष सय्यद सकावत अली, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, माजी नगरसेवक प्रभाकर येरने, गजानन भटारकर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक राव, अँड. चंद्रशेखर चांदेकर, उमेश गोरे, अभिनंदन काळे, नायब तहसिलदार अतुल गांगुर्डे, तालुका प्रशासन व नगर पालिका प्रशासन अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here