गणेशनगर येथील रस्त्याचे भावना घाणेकर यांच्या हस्ते भूमीपूजन.

लोकदर्शन👉(विठ्ठल ममताबादे

उरण दि 7 सप्टेंबर उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील गणेशनगर -2 या परिसरात सिडकोच्या द्वारे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर यांच्या पुढाकारातून गणेश नगर – 2 मधील सिमेंट कॉक्रीटच्या रस्त्याचे भूमीपूजन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस यांच्या हस्ते संपन्न झाले. अनेक वर्षापासून गणेशनगर – 2 या परिसरात सिमेंट रस्ते नव्हते. वाहनांना येण्या जाण्यासाठी रस्ता नव्हता मात्र हा रस्ता आता होणार असल्याने येथील परिसरातील नागरिकांनी सिडको प्रशासनाचे व भावनाताई घाणेकर यांचे आभार मानले आहेत. यावेळी उरण तालुका युवक अध्यक्ष कैलास भोईर, शहर अध्यक्ष गणेश नलावडे, उदयोगपती बसूशेठ, लेबर कॉन्ट्रॅक्टर कुमारदादा, ह.भ. प. राजिवडे महाराज, ह.भ.प. डोंगरे महाराज, ग्रामपंचायत सदस्य अजय म्हात्रे, अनिल घरत, संतोष नलावडे (भावड्या ) आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here