लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय (कला विज्ञान व व्यवसाय) या विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकरीता
सपत्नीक भावपूर्ण निरोप व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले होते, प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष तू.ता. पुंजेकर, सचिव ना.शं. बोबडे, सहसचिव वि.मा.उरकुडे, संचालिका श्रीमती उज्वला चांदेकर होते,विशेष अतिथी म्हणून सत्यजित आमले, ठाणेदार पोलीस स्टेशन गडचांदूर, इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या खोडके मॅडम मुख्याध्यापक धर्मराज काळे पर्यवेक्षक संजय गाडगे हे उपस्थित होते.
याप्रसंगी सेवानिवृत्त कर्मचारी प्रा. शम्मी अ. शरीफ खान, प्रा. प्रमोद मारोतराव वांढरे, श्री चंद्रकांत जनार्दन घाटे ,श्री गणपतराव भुजंगजी आत्राम यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ सन्मानचिन्ह व साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना संस्थेविषयी कृतज्ञता पूर्ण भावना व्यक्त केल्या. भावना व्यक्त करताना त्यांचे अंत:करण गहिवरून आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना अध्यक्षांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी आपले उर्वरित आयुष्य समाजाच्या हितासाठी व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कसे घालवता येतील याचा विचार करावा व संस्थेला शाळेला जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा आपण सहकार्य करावे असे विचार व्यक्त केले. तसेच उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गुणगौरव करून त्यांना दीर्घायुष्याच्या शुभकामना दिल्या त्यासोबतच समाज ऋणाची परतफेड करण्याचा विचार करावा हा मोलाचा संदेश दिला, तर ठाणेदार सत्यजित आमले यांनी शिक्षक हा जन्मभरविद्यार्थी असला पाहिजे असे विचार व्यक्त केले. याप्रसंगी मुख्याध्यापक काळे यांनी विद्यालयाच्या प्रगतीसाठी त्याग,निष्ठा, समर्पण व परिश्रम सर्व कर्मचाऱ्यांनी अंगीकृत करावे हा विचार व्यक्त केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय गाडगे पर्यवेक्षक यांनी तर कार्यक्रमाचे संचालन सेवा जेष्ठ शिक्षक महेंद्र कुमार ताकसांडे यांनी केले, कार्यक्रमाचे आभार कु. ज्योती चटप यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता विद्यालयातील तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
,