काकासाहेब नागरे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, 5 सप्टेंबर ला होणार चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या वतीने सपत्नीक सत्कार

 

लोकदर्शन 👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव ता, कोरपना येथील कर्तव्यदक्ष प्रयोगशील शिक्षक काकासाहेब बाबुराव नागरे यांना सन 2022-23 चा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
येत्या 5 सप्टेंबर ला शिक्षक दिनी सकाळी 11 वाजता चंद्रपूर येथील कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभागृहात त्याचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहेत, असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी(प्राथमिक)यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
काकासाहेब नागरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वच स्तरातून स्वागत केले जाते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here