इकोफ्रेंडली मखराला ग्राहकांची पसंती.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे

उरण दि. 17 ऑगस्ट सध्या गणेशोत्सव काही दिवसावर आले आहे. सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरे केले जाणार आहे. सध्या अनेक ग्राहकांचा ओढा पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे आहे. त्यामुळे उरण बाजार पेठेत तसेच पूर्व विभागात इकोफ्रेंडली कागदी पुठठ्या पासून बनविलेले मखरे मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध आहेत. उरण पूर्व विभागात पिरकोन (फणसवाडी सेक्टर 11)ता. उरण, जिल्हा रायगड येथे कागदी पुट्ट्या पासून इकोफ्रेंडली मखर विक्रीस उपलब्ध आहेत. इकोफ्रेंडली मकर 2000 रुपया पासून उपलब्ध आहेत. इकोफ्रेंडली मखर वापरल्याने पर्यावरणाची होनी होत नाही. इकोफ्रेंडली मखर वापरल्याने कोणतेही साईड इफेक्ट नाही.उलट पर्यावरणाचे संरक्षण होते. त्यामुळे सर्वांनी इकोफ्रेंडली मखराचा वापर करून इकॉफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करावा.असे आवाहन सांज आर्टचे मालक सतीश चंद्रकांत म्हात्रे यांनी केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *