पनवेल तालुक्यातील भिंगार ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी मनसेचे दिपक पाटील

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 18 ऑगस्ट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपतालुका अध्यक्ष दीपक नारायण पाटील यांची पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत भिंगार(भेरलेभिंगार,भिंगारवाडी , शेडुंग या तीन गावांमधून) उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे. सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे दीपक पाटील हे महाराष्ट्र सैनिक म्हणून पनवेल तालुक्यामध्ये खूप नावाजलेले व्यक्तिमत्व आहे. गाव पातळीवर,खेड्यांमध्ये दिपक पाटील यांच्या कामाची खूप ठळक पद्धतीने छाप आहे.पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांच्या नेतृत्वात खूप चांगल्या पद्धतीने दिपक पाटील यांचे कार्य सुरु असून दिपक पाटील यांची ग्रामस्थांनी व इतर सदस्यांनी सर्वानुमते बिनविरोध निवड केली आहे. तालुकाध्यक्ष रामदास पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेत दीपक पाटील यांचे अभिनंदन व सत्कार केले. याप्रसंगी रायगड जिल्हा रस्ते आस्थापना संघटक संजय तन्ना,विजय ठाकूर शाखाध्यक्ष भातान व अन्य सहकारी उपस्थित होते. रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, संदेश ठाकुर यांनी देखील फोन करून दीपक पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.गावकऱ्यांच्या काही समस्या असतील तर त्या ताबडतोब सोडवण्याकरता पूर्णपणे सहकार्य असेल असा शब्द रामदास पाटील मनसे तालुका अध्यक्ष पनवेल यांनी दिला आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *