नगर परिषद, गडचांदूर येथे स्वतंत्र दिन साजरा

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
१५ ऑगस्ट २०२२ रोजी नगर परिषद गडचांदूर तर्फे भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत न.प गडचांदूर कार्यालया तर्फे शहरातील गुणवंत विद्यार्थाना १३ व १४ ऑगस्ट ला न.प.कार्यालय व महात्मा गांधी चौक, गडचांदूर येथे ध्वजारोहनाच मान देण्यात आला व दि १५ ऑगस्ट २०२२ रोजी चंद्रपूर जिल्ह्या मधून १२ वी वाणिज्य शाखे मधून ९८% गुण प्राप्त करून प्रथम कु. अल्लमा शेख, आदित्य बिरला पब्लिक स्कूल गडचांदूर येथील गौतम छाजड ९४.२ टक्के, महात्मागांधी विद्यालय कला विभागातून, प्रगती सिंग १० वी मध्ये ९५.८० टक्के, कु. कांचन मासीरकर ८९.८३ टक्के आदित्य बिरला पब्लिक स्कूल १० वी मध्ये कु.गायत्री यादव यांना ९४.८० टक्के, महात्मा गांधी विद्यालय आलोक रामटेके यांना १० वी मध्ये ९३ टक्के गुण प्राप्त झाल्याने यांचा शाल श्रीफळ व भेट वस्तू देऊन यांचा सन्मानीय मा.सौ. सविता सुरेश टेकाम,( अध्यक्षा) व मा. श्री. शरद जोगी ( उपाध्यक्ष न.प. गडचांदूर) यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी माननीय नगराध्यक्षा सौ. सविता सुरेश टेकाम यांनी नगर परिषद कार्यालय मध्ये तर मा. श्री. शरद जोगी उपाध्यक्ष न.प. गडचांदूर यांचे हस्ते महात्मा गांधी चौक येथे ध्वजारोहण करण्यात आले. सत्कार कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री. चरणदास शेडमाके, प्रशाकीय अधिकारी न.प. गडचांदूर यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन श्री स्वप्नील पिदुरकर अभियंता न.प. गडचांदूर यांनी केले. या कार्यक्रमाला मा. सौ. किरण सुधाकर अहिरकर, सभापती महिला व बालकल्याण, मा.सौ. कल्पना अरुण निमजे, उपसभापती महिला व बालकल्याण, न.प. गडचांदूर, मा.सौ. अर्चना शिवाजी वांढरे, नगर सेविका, मा. सौ. जयश्री राहुल ताकसांडे, नगर सेविका, मा. श्री. विक्रम नामदेवराव येरणे, नगर सेवक, मा. सौ. वैशाली सुनिक गोरे, नगर सेविका, मा. श्री राहुल नारायण उमरे नगर सेवक, मा. श्री. सागर सुरेश ठाकूरवार नगर सेवक, मा. श्री. अरविंद तुकाराम डोहे, नगर सेवक, मा. सौ. मीनाक्षी अशोक एकरे, नगर सेविका, मा. श्री. रामसेवक सतुजी मोरे नगर सेवक, मा. श्री. पापय्या बलराम पोन्नमवार, नगर सेवक, मा. श्री. विजय पांडुरंग ठाकुरवार, नगर सेवक, श्री. अरुण निमजे व्यापारी असोसिएशन चे प्रतिनिधी, शिक्षक वृंद, नागरिक व कर्मचारी वृंद मोठ्या संखेने उपस्थित होते,
,,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *