सावित्रीबाई फुले विद्यालयात देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय ,गडचांदूर.येथे *स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.* यानिमित्ताने आंतरशालेय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेत वर्ग ०५ ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता . अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन स्वातंत्र्याच्यासंग्रामामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या आठवणी गीतांच्या माध्यमातून ताज्या केल्या याप्रसंगी अनेकांचे डोळे पानावले. या स्पर्धेकरिता विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले सदर स्पर्धा वर्ग ०५ ते ०७ आणि ०८ ते १० अशा दोन गटात घेण्यात आली स्पर्धेचे संचालन सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख महेंद्रकुमार ताकसांडे यांनी केले स्पर्धेचे परीक्षक सुरेश पाटील, राजेश वासेकर यांनी सांभाळले या स्पर्धेत वर्ग ०५ ते०७ ते या गटातून प्रथम कु.श्रेया भालेराव ,नंदिनी अर्कीलवार, लायबा शेख, श्रावणी दाते द्वितीय क्रमांक अक्षदा गौरकार तर तृतीय क्रमांक साहिल वासेकर, हिमेश बावणे यांनी पटकाविला. वर्ग ०८ते १० या गटात प्रथम क्रमांक श्रृती अरकीलवार द्वितीय क्रमांक तृप्ती गुरूनुले,नम्रता गुंडले, तर तृतीय क्रमांक अंकुश बावणे ,धनश्री खिरटकर या विद्यार्थ्यांनी मिळविला कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता जी.एन. बोबडे, ज्योती चटप,श्रीमती सुषमा शेंडे, माधुरी उंमरे, जीवन आडे, सी.एम.किन्नाके, बाळकृष्ण मरसकोल्हे, भालचंद्र कोंगरे, बावनकर सर, शशिकांत चेन्ने यांचे सह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *