सेवानिवृत्त प्राचार्य संजय ठावरी यांनी साजरा केला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

 

लोकदर्शन 👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना
,,,,,,,,,,,,,,,,,,,
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कोरपणा येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापक/ प्राचार्य संजय ठावरी यांनी आपल्या घरी शेजाऱ्यासमवेत ध्वजारोहण करून साजरा केला- भारतीय स्वातंत्र्यास 75 वर्ष पूर्ण झाली व देशभर अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येत आहे. कोरपना येथेही सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्राचार्य संजय ठावरी सर यांनी आपल्या घरी ध्वजारोहणाचा कार्यक्रम शेजारी व मित्र मंडळी बोलवून आनंदाने साजरा केला.यावेळी ध्वजारोहण माजी नगरसेवक सुभाष भाऊ तूरानकर यांचे हस्ते करण्यात आले.तर 75 वर्ष निमित्ताने दोन केक उपनगराध्यक्ष इस्माईल शेख व नगरसेवक नितीन बावणे यांनी कापून अमृत महोत्सव साजरा केला.यावेळी ज्येष्ठ नागरिक तुळशीराम पा.डोहे,दादाजी पा. तुरानकर,रमेश दुर्गे, अब्दुल वहाब शेख,दामोधर पा. टेंभुर्डे, कर निरीक्षक निलेश मालेकर, धीरज कोटरंगे,रघुनाथजी तुराणकर,तोडासे पाटील,शेख मांमु , गिरडकर महाराज, अजय राठोड , वाढई ,अनिल कवरासे , विनोद मालेकर, महेश ढवस, ऋषी जोगी, सचिन मोहितकर,राकेश कोरे,अरविंद अवथरे, रेगुंडवार, आकाश तूरानकार, प्रशांत टेंभूडे, सेवानिवृत शिक्षका शालिनी दुर्गे, कलावतीबाई बोरडे, शोभा तूरानकर, ऊदे बाई, आशाताई टेंभूर्डे, वैशाली कवरासे, संगीताताई मालेकर, शांताबाई तुराणकर मनीषा जोगी, प्रिया मोहीतकर, छायाताई भोयर , प्रियंका राठोड, प्रांजली दुर्गे,रेणूका ढवस,वंदना अवथरे, सारिका कोरे,ओम मालेकर, सूरज झाडे,अनुराग ठावरी, इंद्रजीत डोहे,बंटी जोगी,श्रावणी अवथरे, वंशिका कवरासे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन अजय राठोड यांनी केले.तर संजय ठावरी यांनी सर्वांना शुभेच्या देऊन आभार मानले.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *