रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवाशी मंडळाची १४ऑगस्टला सर्वसाधारण सभा

लोकदर्शन बदलापूर👉(गुरुनाथ तिरपणकर)-

बदलापुरमधील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हावासिय मंडळाचे बदलापूरकर आजीव सदस्य तसेच सर्वसाधारण सदस्य असणा-या रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवासी मंडळाची २१वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.१४/०८/२२रोजी सायंकाळी ५वाजता,श्री अपार्टमेंट,शाॅप नं.४,दुसरा मजला,अभिनव बॅकेच्यावर,गांधी चौक,बदलापूर(पुर्व)येथे आयोजित केलेली आहे.या वार्षिक सभेत २०व्या वार्षिक सभेचा कार्यवृत्तांत वाचुन कायम करणे,३१मार्च २०२२अखेर संपलेल्या वर्षाचा अहवाल,उत्पन्न खर्चाचे ताळेबंद पत्रक स्विकारणे व त्यास मंजुरी देणे,सन २०२१-२०२२या वर्षाच्या हिशोब तपासणी अहवालाची नोंद घेणे,२०२२-२०२३या वर्षासाठी हिशोब तपासणीसांची व हिशोब लेखणिकाची नेमणूक करणे व अध्यक्षांच्यावतीने आयत्यावेळी येणा-या विषयांवर चर्चा करणे अशा वरील विविध विषयांवर चर्चा होणार आहे. तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मंडळाच्या बदलापुरकर आजीव-सर्वसाधारण सभासदांनी या२१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित रहावे,असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील व चिटणीस मंगेश कदम यांनी केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *