काँग्रेस नेत्या सुनिता लोढीया यांच्या संस्थेचे नांदा येथील अतिक्रमण हटविण्याचे जिल्हाधिकारी चे आदेश

लोकदर्शन 👉 प्रतिनिधि
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

कोरपन‍ा तहसिल कार्यालयाचे दुर्लक्ष
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
नांदा फाटा,,,,

औद्योगिक नगरी नांदा येथे काँग्रेस नेत्या सुनीता लोढिया अध्यक्ष असलेल्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ नांदा यांचे प्रभू रामचंद्र विद्यालय व महाविद्यालय आहे संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी अकृषक परावर्तित लेआऊटमधील ओपन स्पेस , रस्ते व नाल्यालगतची मोकळी जागा अशा जवळपास ४५ गुंठे जमिनीवर अतिक्रमण करून शाळेची इमारत , प्रवेशद्वार , सुरक्षा भिंत बांधली आहे तहसिलदार कोरपना यांनी केलेल्या चौकशीत अतिक्रमण केले असल्याचे सिध्द झाल्याने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी शासकीय जागेवरील सर्व अतिक्रमण गटविकास अधिकारी , नांदा ग्रामपंचायतीचे सचिव यांनी तहसीलदार कोरपना यांचे सहकार्य घेऊन पोलीस बंदोबस्त व फौजफाट्यासह अतिक्रमण हटविण्याचे निर्देशित केल्याने चांगलीच खळबळ उडाली असून अतिक्रमण करणार्‍या शिक्षण संस्थेचे चांगलेच धाबे दणाणले आहेत

सविस्तर वृत्त असे की , चंद्रपूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा काँग्रेस नेत्या सुनीता लोढिया व काँग्रेस पक्षाकडून चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणुक लढविलेले अनिल मुसळे यांची वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ नांदा या नावाने मोठी शिक्षण संस्था आहे नांदा येथील सर्व्हे क्रमांक ७४/१अ व ७४/१ ब या अकृषक परावर्तित लेआउट मधील काही भूखंड संस्थेने खरेदी केलेले आहेत संस्थेने या लेआऊट मधील ओपन स्पेस , रस्ते व नाल्यालगत सोडलेली मोकळी जागा यावर हळूहळू अतिक्रमण करून सुरक्षा भिंत उभी करून रस्ते बंद केले मोठे प्रवेशद्वार उभे केले शिव वैभव इंग्लिश मिडियम शाळेची इमारत अतिक्रमित जागेवर उभी केली ग्रामस्थांनी संस्थेने केलेल्या अतिक्रमणाबाबत अनेकदा ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या होत्या परंतु कारवाई करण्याचे सोडून नांदा ग्रामपंचायतींच्या पदाधिकार्‍यांनी सुनिता लोढीया व अनिल मुसळे यांना आणखी आगाऊचे अतिक्रमण करण्याची मुभा देवुन मदत केली सुनिता लोढीया व अनिल मुसळे यांनी कुठलीही शासन परवानगी न घेता बेकायदा टोलेजंग इमारत उभी केली आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ नांदा यांनी केलेल्या अतिक्रमणाची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे केली जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये तहसीलदार कोरपना यांनी मोका पंचनामा चौकशी करुन तपासणी केली अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आल्याने नांदा ग्रामपंचायतीने सर्व अतिक्रमण काढून टाकण्याची कायदेशीर प्रक्रिया राबवावी असा अहवाल तहसीलदार कोरपना यांनी जिल्हाधिकारी यांना पाठविला जिल्हाधिकारी यांनी २४ जून २०२२ रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती कोरपना , सचिव ग्रामपंचायत नांदा यांनी तहसीलदार कोरपना यांचे सहकार्य पोलिस बंदोबस्तात शासकीय जागेवरील सर्व अतिक्रमण निष्कासित करण्याचा आदेश केला २४ जुन रोजीचा आदेश तहसिलदार कोरपना यांना प्राप्त झालेला असून तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी यावर कुठलीही उचित कारवाई केल्याचे दिसत नाही गटविकास अधिकारी व नांदा ग्रामपंचायतीच्या सचिवाचे नावाने २४ जुन २०२२ रोजीचे पत्र तहसील कार्यालयात धूळ खात पडून होते जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २६ जुलै २०२२ रोजी स्मरणपत्र पाठवून अतिक्रमण निष्कासित केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे पत्र पाठविण्यात आल्याने तहसिल कार्यालयाने २७ जुलै २०२२ ला २४ जुन २०२२ रोजीचा आदेश गटविकास अधिकारी यांना पोचता करून दिला नांदा ग्रामपंचायतीच्या सचिवाचे पत्र अद्यापपर्यंत पोहचता केलेले नाही यावरुन तहसिलदार अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यास जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याचे दिसते जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून सुनिता लोढीया व अनिल मुसळे यांच्या संस्थेने केलेले अतिक्रमण तातडीने काढून टाकण्याची मागणी तक्रारकर्त्यांनी केली आहेत तहसीलदार , गटविकास अधिकारी व नांदा ग्रामपंचायतीच्या कारवाईकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहेत जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने अतिक्रमण करणार्‍या संस्थेचे धाबे चांगलेच दणाणले आहेत

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

सुनिता लोढीया व अनिल मुसळे यांच्या संस्थेचे अतिक्रमण हटविण्याबाबत अनेकदा ग्रामपंचायतीकडे मागणी केली होती अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्याऐवजी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी अतिक्रमणधारकाची पाठराखण करत होते जिल्हाधिकारी यांनी अतिक्रमण निष्कासित करण्याचे निर्देश दिले आहेत आतातरी स्थानिक प्रशासनाने अतिक्रमण काढून आम्हाला न्याय दिला पाहीजे

गोकुल बन्सोड
तक्रारकर्ता
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
मी कोरपना येथे नव्याने च रूजू झालो आहे,नविन आहे या प्रकरणाबाबत अवगत नाही माहीती घेऊन उचित कारवाई करणार आहे

  1. विजय पेंदाम
    गट विकास अधिकारी पं.स.कोरपना
लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *