वरोरा तालुक्यातील पूरग्रस्तांना जीएमआर वरोरा तर्फे मदतीचा हात

लोलदर्शन 👉 राजेन्द्र मर्दाने

*वरोरा* : जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरस्थितीने मोठ्या प्रमाणात जनजीवन अस्तव्यस्त झाले. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांना पुराचा तडाखा बसला. पुरामुळे घराचे, शेतपिकांचे व सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेडने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आवाहनाला साद देत पूरग्रस्तांसाठी धान्याच्या किटच्या रुपात मदतीचा हात पुढे केला.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर कायम आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही मागील अनेक दिवसांपासून पावसाची सततधार सुरूच आहे. नद्या, नाले सर्व ओंसडून वाहत आहेत त्याचच धरणातून सोडणाऱ्या पाण्यामुळे पुन्हा पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मागे वरोरा तालुक्यात सुद्धा अनेक गावांमध्ये पूर्व परिस्थिती निर्माण झाली होती त्यात काही गावे पाण्यांनी पूर्णता वेढली गेली. अनेक गावकऱ्यांचे घरदार पाण्यामध्ये गेल्याने अंगावरील कपड्यावरच त्यांना अन्य ठिकाणी आसरा शोधावा लागला आहे. प्रशासन, अनेक सेवाभावी संस्था व जनप्रतिनिधी तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आलेले आहेत यातच वरोरा तालुक्यातील विद्युत निर्मिती प्रकल्प एनर्जी लिमिटेड नेहमीप्रमाणे आपले सामाजिक बांधिलकी जोपासत या पूर्वग्रस्तांच्या मदतीसाठी आपला सहकार्याचा हात पुढे केलेला आहे. आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेड व जीएमआर वरलक्ष्मी फाऊंडेशन द्वारे पूरग्रस्तांना धान्याची किट आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी जीएमआर हेड कार्पोरेट विनोद पुसदकर, कंपनीचे पदाधिकारी अकबर अली उपस्थित होते. स्थानीय प्रशासनाद्वारे गरजू व्यक्तींना वितरण हे धान्याचे किट करण्यात येईल, असे आमदार धानोरकर यांनी सांगितले. वेळोवेळी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या सामाजिक दायित्वाचे निर्वाहन काटेकोरपणे करणाऱ्या जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेडचे प्लांट हेड धनंजय देशपांडे, फाऊंडेशनचे संचालक, पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले.
जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेड आपल्या स्थापनेपासूनच तालुक्यांमध्ये आपले सामाजिक दायित्व अंतर्गत कार्यरत आहे. जीएमआर वरलक्ष्मी फाउंडेशन अंतर्गत आरोग्य, स्वच्छता, शिक्षण व स्वंयरोजगार क्षेत्रात आपले योगदान देत आहे. कंपनीने परिसरातील गावांमध्ये ९०० वैयक्तिक स्वच्छतागृहाचे बांधकाम करून अनेक गाव हागणदारी मुक्त करण्यात जीएमआरचा सहयोग राहिला आहे. स्वच्छ, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी कंपनी द्वारे १७ गावांमध्ये ऑरो वॉटर एटीएम लावण्यात आलेले आहेत. जीएमआर वरलक्ष्मी फाउंडेशन तर्फे चालविल्या जाणाऱ्या क्लास मधून नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांची निवड, प्रतिभा लायब्ररीच्या माध्यमातून अनेक युवक शासकीय नोकऱ्यांमध्ये निवड झाली आहे नुकताच या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेड कंपनीस त्यांच्या सामाजिक दायित्व व सीएसआर प्रकल्पासाठी राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळे पुरस्कार प्राप्त झालेले आहे असे, कंपनीचे प्लांट हेड धनंजय देशपांडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *