उरण मधील मी एकविरा प्रेमी ग्रुपतर्फे श्री एकविरा देवी मंदिर परिसरात वृक्षारोपण.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि. 25 जुलै मी एकविरा प्रेमी व्हाटसअप ग्रुप तर्फे कोप्रोलीचे माजी उपसरपंच देविचंद म्हात्रे(देवेन) आणि मित्र परीवार यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यातील विशेषत: पूर्व विभागातील नागरिकांनी, युवकांनी एकत्र येत कार्ला येथील प्रसिद्ध श्री एकविरा देवी मंदिर येथे जाउन आईचे दर्शन घ्यायचे ठरविले. त्यानुसार देविचंद म्हात्रे यांनी केलेल्या नियोजनानुसार रविवार दि 24/7/2022 रोजी सकाळी उरण मधून सर्व आई एकविरा प्रेमी एकविरा आईचे दर्शन घेण्यासाठी कार्लासाठी रवाना झाले. एकूण 130 भाविक भक्त या उपक्रमात सहभागी झाले होते.उरण मधून सर्व युवक आपापले बाईक घेऊन एकविरेला गेले होते.सर्वजण एकविरेला पोहोचल्या नंतर मंदिरात आईचे दर्शन घेतले. नंतर जेवणाचा कार्यक्रम व त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन व्हावे, निसर्गाचे सरंक्षण व्हावे या दृष्टीकोणातून या सर्व युवकांनी एकत्र येत मंदिर परिसरात वृक्षारोपण केले.व पर्यावरण संरक्षणाचा संदेश या युवकांनी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमातून दिला.कार्ला वरून उरणला येताना बाईक वरूनच श्री आई एकविरेचा जयघोष करत सर्वजण आले.सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *