ऍड, दीपक चटप चा शिक्षणमहर्षी ऍड,बाबासाहेब वासाडे यांच्या हस्ते सत्कार

लोकदर्शन👉 मोहांन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
गडचांदूर येथील युवा नेतृत्व ॲड.दिपक यादवराव चटप यांची लंडन विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी चेवणींग या जागतिक प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ४५ लाख रुपये शिष्यवृत्तीचा तो देशातील पहिला तरुण वकील मानकरी ठरला असून त्याची निवड झाल्याबद्दल शिक्षणमहर्षी कृषी जीवन विकास प्रतिष्ठान येनबोडी चे अध्यक्ष ऍड,बाबासाहेब वासाडे यांच्या हस्ते सत्कार 5 जुलै ला करण्यात आला.तसेच दीपक चे वडील यादवराव चटप,व आई सौ,हेमलता चटप यांचा सुद्धा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर च्या प्राचार्या सौ स्मिताताई चिताडे, दीपक चे वडील माजी पंचायत समितीचे सदस्य यादवराव चटप,आई सौ,हेमलता चटप, भाऊ डॉ जयदीप चटप,माजी सरपंच रऊफ शेख,वासुदेवराव गोरे,गोविंदराव विरुटकर, भास्कर चटप, शैलेश विरुटकर, प्रा, राजेंद्र खाडे, प्रा, अविनाश वासाडे,प्रा अशोक डोईफोडे, मोहन भारती तथा इतर मान्यवर मंडळीची ऊपस्थिती होती.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *