Home
Home गडचांदूर / कोरपणा समृद्धी नागरी सह. पतसंस्था मर्या. राजुरा च्या पहिल्या गडचांदूर शाखेचे उद्घाटन संपन्न

समृद्धी नागरी सह. पतसंस्था मर्या. राजुरा च्या पहिल्या गडचांदूर शाखेचे उद्घाटन संपन्न

 

लोकंदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
*समृद्धी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, राजुरा या पतसंस्थेची पहिली सुसज्ज शाखा गडचांदूर येथे वीर बाबुराव शेडमाके चौक, येथे सुरु झाली आहेत. शाखेचे उद्घाटन व्यापारी असोसिएशन गडचांदूरचे अध्यक्ष हंसराज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ३ जुलै ला गडचांदूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. सविताताई टेकाम यांच्या हस्ते करण्यात आले.*

*प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर असोसिएशन गडचांदूरचे अध्यक्ष डॉ. प्रदीप खेकडे, समृद्धी नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा बालाजी नागरी सहकारी पतसंस्था, राजुराचे अध्यक्ष सिद्धार्थ पथाडे, संस्थेचे अध्यक्ष तथा ग्राम पंचायत बामणवाडाचे उपसरपंच सर्वानंद वाघमारे, सचिव मसुद अहमद शेख, उपाध्यक्ष रवि अक्कलवार, कोषाध्यक्ष शंकर वाटेकर, संचालक डॉ. भागवत सोनवणे, संचालक लुतफुल्ला बेग, श्रीराम कुईटे, बी. यु. बोर्डेवार, संचालिका छबुताई कोडापे, संचालिका गिता आत्राम व गडचांदूर येथील गणमान्य नागरिक उपस्थित होते.*

*या प्रसंगी गडचांदूर छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व रिपब्लिकन प्रचारक अशोककुमार उमरे आणि प्रेमदास मेश्राम यांनी पतसंस्थेचे अध्यक्ष सर्वानंद वाघमारे आणि सचिव मसुद अहमद शेख यांची सदिच्छा भेट घेऊन उभयतांचे अभिनंदन आणि पतसंस्थेच्या भरभराटीस मंगलमय सदिच्छा व्यक्त करण्यात आली.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here