अल्ट्राटेक फाऊंडेशन द्वारा उन्हाळी शिकवणी वर्गाचा समारोप

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, आवारपूर अंतर्गत अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाऊंडेशन च्या वतीने कंपनीच्या परिसरातील दहावीच्या विद्यार्थ्याकरिता शिकवणी वर्गाचे आयोजन करण्यात आले. या मध्ये श्री. शिवाजी इंग्लिश हायस्कूल, नांदा, श्री प्रभू रामचंद्र विद्यालय, नांदा, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, आवारपूर, माऊंट पब्लिक स्कूल, नांदा, प्रियदर्शनी विध्यालय नांदा व महात्मा गांधी विद्यालय, गडचांदुर या शाळेतील एकूण ८५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या शिकवणी वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयासंबंधी पायाभूत माहिती देण्यात आली. एक महिन्याच्या कालावधीमध्ये राबविण्यात येणाऱ्या या शिकवणी वर्गाचा समारोपीय कार्यक्रम नुकताच पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम पी.एस., युनिट हेड, यांची उपस्थिति होती. तर प्रमुख पाहुने म्हणुन गौतम शर्मा, उपाध्यक्ष, कर्नल दिपक दे, महाव्यवस्थापक, जी.माथुर, प्रिन्सिपल, (ए.बी.पी.एस)., रूपा बोरेकर, (प्रिन्सिपल), एकलव्य इंग्लिश स्कूल, देवाडा (राजुरा) उपस्थित होते. त्याच प्रमाणे सुनिता नरूला, नागेश फुलझेळे, अंजली तायडे, प्रत्यूषा भट्टाचार्यजी, डॉक्टर मनिष, शेख सर, कमलाकर देरकर, बरसागडे, भोयर, रत्नाकर चटप, वैशाली लांडगे, भारती मोर्हुले, रूची बन्सल यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या माध्यमातून भारती यादव, लक्ष्मी शिंगाडे, ईंदू मालगह या विध्यार्थांनी उन्हाळी शिकवणी वर्गासंबंधी आपले मनोगत व्यक्त केले. मुलांकडून शिक्षण व देशावरती अप्रतिम नुत्य सुद्धा प्रदर्शीत करण्यात आले. यामध्ये त्यांनी बोलताना सांगितले की, शिकवणी वर्गाच्या माध्यमातून इंग्रजी, विज्ञान व गणित या विषयासंबंधीच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट झाल्या. अभ्यास कसा करावा, स्वतःचे नोट स्वतः कसे तयार करावे याविषयी देखील योग्य मार्गदर्शन मिळाले.

अध्यक्षीय भाषणामध्ये श्रीराम पी.एस., युनिट हेड यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की एस.एस. सी. हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील मुख्य वळण आहे. इथुनच विद्यार्थी विविध शिक्षण क्षेत्रासंबंधी गांभीर्याने विचार करू लागतात. त्यांच्या या विचाराला योग्य दिशा मिळण्याकरिता शिकवणी वर्ग हे एक उत्तम माध्यम बनू शकते, कारण यामध्ये शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्व विकासावर देखील भर दिला जातो.

गौतम शर्मा, उपाध्यक्ष यांनी सर्व मुलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात व अनमोल मार्गदर्शन केलेत.

कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनामध्ये बोलताना कर्नल दीपक
डे म्हणाले की आयुष्यात काही सहजासहजी मिळत नाही त्याकरिता कठीण परिश्रम व जिद्द याला अनन्या साधारण महत्व आहे तुमच्या प्रयत्नांना योग्य मार्गदर्शनाची जोड मिळावी म्हणून अल्ट्राटेक च्या वतीने दर दरवर्षी या शिकवणी वर्गाचे आयोजन केले जातात.

विशेष म्हणजे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांनी सुध्दा या शिकवणी वर्गास मुलांना मार्गदर्शन केले.

या शिकवणी वर्गाच्या माध्यमातून भारती मुर्हुले यांनी इंग्रजी, रुपा बन्सल यांनी गणित तर वैशाली लांडगे यांनी विज्ञान हे विषय शिकविले. शिक्षिका या नात्याने या सर्वानीच आपली भूमिका अतिशय उत्तम रित्या पार पाडली. विद्यार्थ्यांना कळेल त्या भाषेत त्यांनी शिकविण्याचा प्रयत्न केला. या विषया व्यतिरिक्त शिकवणी वर्गाच्या दरम्यान विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास, नियोजन व शिस्त, सकारात्मक दुष्टीकोण इ. विषयासंबंधी देखील मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित सर्व मुलांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते इंग्रजी शब्दकोश वितरित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे संचालन सचिन गोवारदीपे तथा आभार प्रदर्शन सतीश कुमार मिश्रा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय ठाकरे व देविदास मांदाडे यांनी परिश्रम घेतले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *