गणोजा देवी येथील पेढी नदीच्या पात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह आला आढळून

 

मृतक इसमाची ओळख अजूनही अज्ञातच

लोकदर्शन 👉गनोजा (देवी) प्रतिनिधी
( हर्षल गुल्हाने)

आज सायंकाळच्या सुमारास भातकुली तालुक्यातील येणारे गाव गनोजा देवी येथे पेढी नदीच्या पात्रांमध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने स्थानिक गावातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून त्या ठिकाणी गर्दी बघायला मिळाली तर गावकऱ्यांनी अतिरिक्त कार्यभार असणारे पोलीस पाटील बोरकर तथा भातकुली पोलीस स्टेशनला संपर्क करून सदर घटनेची माहिती नागरिकांनी दिली. तर संपूर्ण घटनेचा पंचनामा वृत्त लिहिण्या पर्यंत संपूर्ण परिसरामध्ये या घटनेची माहिती प्रसार झाली. मात्र मृतक इसमाचे अज्ञात ओळख पटल्याने भातकुली पोलिस इसमाच्या ओळखीचा तपास करीत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *