इन्फंट कान्व्हेंट येथे शिक्षकांसाठी दहा दिवसीय कार्यशाळेचे आयोजन.

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

राजुरा :– इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल येथे शाळेच्या शिक्षकांसाठी, त्यांच्या व्यक्तिगत विकास, मुल्यशिक्षण, अध्ययन, अध्यापन व शालेय अभ्यासक्रम यासंदर्भातील नवीन तंत्रज्ञान, सुविधा व अध्यायात माहिती यावर आधारीत १० दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दिनांक १४ ते २४ जानेवारी २०२२ पर्यंत ही कार्यशाळा चालणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे संचालक अभिजित धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रशिक्षक उद्धव राठोड, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्यध्यापिका मंजूषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *