सावळज सिध्देश्वर पतसंस्थेत सुनील दबडे यांचे व्याख्यान संपन्न .

लोकदर्शन 👉राहुल खरात

सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा . सुनील दबडे यांचे सावळज येथील सिध्देश्वर पतसंस्थेच्या सभागृहात ” चला आनंदाने जगुया ” . या विषयावर नुकतेच व्याख्यान पार पडले . सावळजच्या जेष्ठ नागरिक संघातर्फे या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष सिदगौड पाटील , प्रकाश पाटील , महादेव चिवटे , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विश्वास पाटील , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचीव ताजुद्दीन तांबोळी , तालुका अध्यक्ष नलिनी पवार , पतसंस्थेचे मालक प्रकाश पाटील , जिल्हा परिषद सदस्य सागर पाटील , तासगाव तालुक्याचे सेवादल अध्यक्ष मच्छिंद्र पाटील , तालुका उपाध्यक्षा सोनाली पाटील , राष्ट्रवादीच्या तासगाव शहराच्या उपाध्यक्षा पुनम माळी ,रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी एस. ए . पाटील , सावळजच्या सरपंच पोळ मॅडम तसेच संघाचे बहुसंख्य सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते .
यावेळी प्रा . दबडे यांचा तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व सावळजच्या जेष्ठ नागरिक संघातर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला .
यावेळी दबडे यांनी तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस करीत असलेल्या सामाजिक कामांचे भरभरून कौतुक केले . जेष्ठ नागरिक संघ जेष्ठांसाठी चांगले उपक्रम राबवित आहे याबद्दलही दबडे यांनी संघाचे कौतुक केले .
” चला आनंदाने जगुया ” . या विषयावर यावेळी प्रा . दबडे यांचे बहारदार व्याख्यान झाले . व्याख्यानाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला . यापूर्वी तासगाव शहरातही या विषयावर दबडे यांचे व्याख्यान झाले होते . हे व्याख्यान जेष्ठांसाठी , तरुणांसाठी , महिला वर्गासाठी उपयुक्त असल्यामुळे या व्याख्यानाला मागणी वाढत आहे .
व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा . ऊनऊने यांनी केले .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *