भेंडखळ क्रिकेट अकॅडमी ची भरारी

 

लोकदर्शन उरण👉 दि १४विठ्ठल ममताबादे


भेंडखळ क्रिकेट अकॅडमी च्या विविध वयोगटातील संघाने यंदाच्या मोसमात सहा टुर्नामेंट मध्ये अंतिम फेरी गाठली व त्या पैकी तीन ठिकाणी विजेतेपद मिळवलं. या मध्ये वहाळ उलवे नोड येथे १४ वर्षाखालील मुलांच्या टुर्नामेंट मध्ये विजेते पद, बोकडविरा येथे १४ वर्षा खालील मुलांच्या टुर्नामेंट मध्ये विजेतेपद व भेंडखळ येथे १२ वर्षाखालील मुलांच्या टुर्नामेंट मध्ये विजेतेपदाचा समावेश आहे. केवळ दोन वर्षापूर्वी स्थापन केलेल्या या अकॅडमी ने मिळवलेले यश पाहून संपूर्ण रायगड जिल्हयातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या यशामध्ये अनेक मुलांनी चमकदार कामगरी केली आहे. त्यात जिदनेश म्हात्रे(जिमी) , दक्ष पाटील, साम्य पाटील, निर्जर पाटील, मंत्र पाटील, आशिर्व पाटील या फलंदाजांची कामगिरी सर्वोत्कृष्ट होती. बोलर्स मध्ये गंधार माळी, प्रणीकेत पाटील, अंजली गोडसे, दक्ष पाटील, आशिर्व पाटील यांनी सर्वाधिक बळी घेतले. बीसीए चे अध्यक्ष संदीप पाटील,उपाध्यक्ष मनोज भगत यांनी मुलांना सतत प्रेरणा दिली . तसेच शरद म्हात्रे ,विशाल ठाकूर यांनी मुलांकडून नेट मध्ये नियमित सराव करून घेत मार्गदर्शन केले.त्याच प्रमाणे प्रमुख प्रशिक्षक नयन कट्टा सर यांचे महत्वाचे मार्गदर्शन लाभले.भेंडखळ क्रिकेट अकॅडमीतील मुलांच्या बॅटिंग टेक्निक व कामगिरीचे सर्व जिल्हाभर कौतुक होत आहे. या सर्व कामगिरी मागे पालक वर्गाचं देखील खूप मोठं योगदान आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *