स्व. इंदिरा गांधी उच्च प्राथ. माध्य. व कनिष्ठ महाविद्यालय ( आर्ट व सायन्स) निमखेडा ता- मौदा जि – नागपूर चा निकाल

लोकदर्शन 👉 महेश गिरी

100%*. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल काल ऑनलाईन जाहीर झाला त्यात स्व इंदिरा गांधी उच्च प्राथ. माध्य. व कनिष्ठ महाविद्यालय निमखेडा ता- मौदा इयत्ता बारावी चा विद्याथ्र्यांनीं नेत्रदीपक यश संपादन केले आहे एकूण परीक्षेला बसलेल्या समस्त विद्यार्थांनी सुयश मिळविले त्यापैकी सायन्स शाखेतून प्रथम कु. माधुरी भोला चव्हाण, द्वितीय भावेश राजेंद्र शिवणकर, तृतीय आर्यन वाघोलाल महिल्ले तसेच आर्ट शाखेतून प्रथम कू.सेजल रविंद्र बनकर, द्वितीय अभिषेक शेषराव राऊत, तृतीय साक्षी विजय कडूकार यांनी क्रमांक पटकावला आहे या प्रचंड यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष श्री विशाल खांडेकर, रक्षक खांडेकर, शाळेचा मुख्याध्यापिका प्राथमिक शांताताई व. खांडेकर, मुख्याध्यापिका माध्यमिक अल्का के. वासनिक, पर्यवेक्षिका तेजस्विनी जबलपूरे , सिद्धार्थ उके सर, बुजाडे मॅडम, गणवीर मॅडम, डाखोडे मॅडम, पातुरी मॅडम, जांबुळे सर, भोवते सर, नागपुरे मॅडम, वाकोडकर मॅडम, तसेच समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी गण यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *