नफरवाडी ग्रामस्थ तर्फ हवालदार बापू भगवानराव कवठेकर यांचा नफरवाडी ग्रामस्थांतर्फे नागरी सत्कार

 

लोकदर्शन पाटोदा ;👉 राहुल खरात

पाटोदा-जवळच असलेल्या नफरवाडी येथील भूमिपूत्र हवालदार बापूराव भगवानराव कवठेकर 22 वर्ष सैन्यात देश सेवा करून आपल्या मातृभूमी नफरवाडी येथे सहीसलामत व सुखरूप गावी आले म्हणून गावातील आप्पासाहेब मंडलीक (फौजी )सरपंच बंडू सवासे उपसरपंच आबाराजे चव्हाण माजी सरपंच भिमराव तांबे माजी सरपंच बापूराव सवासे दत्तात्रय ढेरे सर मुख्याध्यापक संजय सावंत सर लहू ढेरे (फौजी) तसेच पाटोदा येथील नगरसेवक वाघमारे भारतीय जनता पार्टीचे
बीड जिल्हा उपाध्यक्ष मा. ॲड. सुधीर घुमरे , सुरेंद्र बाबा तिपटे समाजसेवक तसेच पंचक्रोशीतील पारगाव घुमरा ,येवलवाडी आणि पाटोदा येथील नागरिक यास सेवापूर्ती सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले . गावातील प्रतिष्ठित नागरिक तरुण युवक माता-भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या
सर्वप्रथम बापूराव कवठेकर आपल्या गावी आल्याबरोबर तोफांची सलामी देऊन ढोल-ताशाच्या गजरात त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी गावातील महिलांनी आरतीचे ताट घेऊन या सैनिकाला औक्षण केले नंतर ग्रामपंचायत कार्यालय समोर भाषणाचा कार्यक्रम आयोजित केला होता या ठिकाणी आल्याबरोबर बापू कवठेकर यांचे हस्ते स्वराज्य दिनाचा ध्वज फडकवण्यात आला . सर्वप्रथम हनुमान मंदिरात जाऊन पूजन करून या सैनिकाने आशीर्वाद घेतले नंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रथम नागरिक गावचे सरपंच बंडू सवासे ग्रामसेवक ओमप्रकाश सूर्यवंशी , फौजी आप्पासाहेब मंडलीक व बापूराव फौजी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमाला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली .याप्रसंगी बाहेर गावाहून आलेल्या कार्यकर्त्यांनी बापूराव कवठेकर या सैनिकाचा हार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. गावाच्या वतीने सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते फेटा बांधून पुष्पहार घालून पुष्पगुच्छ देऊन भव्य स्वागत करण्यात आले याप्रसंगी बाहेरून आलेल्या पाहुण्यांचाही गावाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली सर्वप्रथम मुख्याध्यापक श्री संजय सावंत सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बापूराव कवठेकर सारखा हुशार विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर होण्यासारखा असतानादेखील परिस्थितीमुळे त्याला शक्य झाले नाही म्हणून त्यांनी सैन्यात जाणे पसंत केले व 22 वर्षे देशाची सेवा केली आणि आपल्या मायभूमीला परत आले त्यांच्या जीवनातील सुरुवातीच्या हलाखीच्या परिस्थितीबद्दल सावंत सरांनी त्यांची हकीगत सांगितली. कठीण प्रसंगांवर मात करून शिक्षण केले आणि सैन्यदलात भरती होऊन देशाची सेवा केली आता गावातील तरुण पिढीला सैन्य भरतीसाठी मार्गदर्शन करावे आणि गावाची सेवा करावी तसेच आपले कौटुंबिक जीवन सुखी समाधानी जगावे गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहकार्य करून नोकरीला लावण्यासाठी प्रयत्न चालू ठेवावेत हे सांगून भावी आयुष्य सुखी समाधानी व आरोग्यमय जीवन जगावं यासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर माननीय दत्तात्रय ढेरे सर यांनी बापू कवठेकर बद्दलच्या आठवणी सांगितल्या त्याची जिद्द आणि चिकाटी प्रयत्न यामुळे तो यशस्वी झाला हे तरुण पिढीला आदर्श घेण्यासारखे आहे हे सांगितले तसेच ह भ प दराडे महाराज यांनीही सैनिकाची नोकरी कशी असते ?आणि सैनिक यामुळेच देश आणि देशातील जनता तशी सुखी राहते हे सांगून बापू कवठेकर यांना भावी आयुष्य सुखासमाधानाने जगण्यासाठी शुभेच्छा दिल्या. समाज सेवक सुरेंद्र बाबा तिपटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बापूराव फौजी यांनी आपल्या गावातील तरुण पिढीला सैन्या मध्ये दाखल करण्यासाठी योग्य प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करावे हे सांगितले.ॲड. सुधीर घुमरे भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बापू कवठेकर यांनी आतापर्यंत देशाची सेवा केली आता गावाची व गावातील लोकांची समाजसेवा करून एक नवा आदर्श घालावा युवा पिढीला सैन्यामध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन करावे हे सांगितले. पारगाव घुमरा येथील ह भ प आप्पासाहेब घुमरे यांनी बापू कवठेकर हा माझा वर्गमित्र आहे त्याच्याविषयीच्या आठवणी त्यांनी सांगितले व त्यांच्या भावी जीवनाला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी गावातील आजी-माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित महासांगवीचे श्री राधाकिसन गर्जे फौजी सरदार फौजी तसेच पाटोदा येथील माजी सैनिक मिळून तयार झालेली त्रिदल समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष सचिव व सर्व पदाधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक तरुण युवा पिढी गावातील माता-भगिनी व पंचक्रोशीतील मान्यवर नेतेमंडळी अधिकारीवर्ग आणि बापू कवठेकर यांचे वर्गमित्र भरपूर प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शहाजी चव्हाण सर यांनी केले नाष्टा व चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *