मराठी साहित्य मंडळा तर्फे स्त्री शक्तीचा जागर जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यस्तरीय काव्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

लोकदर्शन👉 राहुल खरात

ठाणे ;

*प्रत्येक महिलेने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा चा आदर्श पुढे ठेवून समाजामध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे ज्येष्ठ सिनेअभिनेत्री सुषमा शिरोमणी यांचे प्रतिपादन.*

*आर एस पी कमांडर मनिलाल शिंपी यांच्या खानदेशी अहिराणी काव्याचा व आर एस पी अधिकारी भानुदास शिंदे यांच्या नातं रिचार्जे करा या काव्याचा काव्य रसिकांनी घेतला मनसोक्त आनंद.*

ठाणे (भानुदास शिंदे):अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र ठाणे येथे मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय काव्य संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी, *ज्येष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर* यांच्या अध्यक्षतेखाली, *ठाणे महानगरपालिका महापौर नरेश म्हस्के* यांच्या प्रमुख उपस्थितीत, *ज्येष्ठ सिनेअभिनेत्री मराठी सिनेमातील फटाकडी या नावाने प्रसिद्ध सुषमा शिरोमणी* यांना, *अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट आणि ज्येष्ठ कवयित्री राष्ट्रीय उपाध्यक्ष ललिता गवांदे यांच्या हस्ते, साहित्यातील मानाचा आणि अत्यंत प्रतिष्ठेचा कला भूषण जीवन गौरव पुरस्कार* देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी बोलताना *अभिनेत्री सुषमा शिरोमणि* यांनी सांगितले की, 1996 नंतर सर्वांना मी या जगात आहे की नाही ही शंका होती परंतु *फिल्म डायरेक्टर सुभाष काळे* साहेबांनी माझ्या कलागुणांना माझ्यातील अभिनेत्रीला पुन्हा प्रेक्षकांसमोर आणून मला पुनर्जन्म दिला आहे. व त्यांच्या मुळेच मला हा कला भूषण पुरस्कार आज प्राप्त झाला आहे. जागतिक महिला दिन निमित्त *ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणि* यांनी सर्व महिला भगिनींना आव्हान केले की, महिलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श समोर ठेवून समाजामध्ये आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे. जागतिक महिला दिनानिमित्त मराठी साहित्य मंडळ ठाणे यांच्यातर्फे *प्राचार्य रेखा दिक्षित (कोल्हापूर) यांना विद्या भूषण पुरस्कार* देण्यात आला. *श्रीमती अर्चना पानारी (कोल्हापूर) यांना साहित्यभूषण* म्हणून गौरवण्यात आले. *डॉ प्रियंका सारंग यांना समाज भूषण* *डॉ.तृप्ती महाडिक यांना वैद्दिक भूषण पुरस्कार देऊन* गौरविण्यात आले. *अनघा जाधव यांना निवेदिका भूषण* म्हणून गौरव करण्यात आला. मराठी साहित्य मंडळाचा *राष्ट्रीय उपाध्यक्ष ललिता गवांदे* यांनी प्रास्ताविक केले. व अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे *राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर* यांनी जागतिक महिला दिन प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील सावित्रीच्या शोध घेऊन विविध क्षेत्रातील महिलांना पुरस्कार देऊन साजरा केला जातो याविषयी माहिती दिली.याप्रसंगी सोलापूर येथून आलेल्या *ज्येष्ठ कवयित्री डॉ रजनी दळवी,* *सांगली येथून मराठी लेखिका डॉ.सरोज भोसले* , यांनी स्त्री शक्ती विषयी आपले मनोगत व्यक्त केले. *आर एस पी कमांडर मणिलाल शिंपी* यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देणारे खानदेशी अहिराणी भाषेत काव्य,(गीत) प्रेक्षकांसमोर सादर केले .खानदेशी काव्य ऐकून प्रेक्षकांनी अत्यंत आनंदात टाळ्यांचा जल्लोषात मनिलाल शिंपी यांचे अभिनंदन केले. तसेच *फिल्म डायरेक्टर काळे आणि प्रसिद्ध ज्येष्ठ सिनेअभिनेत्री सुषमा शिरोमणि यांच्या हस्ते निमंत्रित कवी मनिलाल शिंपी व भानुदास शिंदे* यांचा तसेच सर्व निमंत्रित कवींचा शाल, ग्रंथभेट व सन्मान पत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी *आर एस अधिकारी भानुदास शिंदे* यांनीही चला नातं रिचार्जे करू या ही सुंदर अशी कविता सादर केली. सदर कार्यक्रमास ठाणे जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून अनेक नामवंत कवी व नवोदित कवी यांनी सहभाग नोंदवला. राज्य खाजगी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष *ज्ञानदेव हांडे यांनी* सर्व कवींना शुभेच्छा दिल्या कवी गोलघुमट यांनी आठ मार्च ही शीर्षक असलेली वेगळ्या धाटणीची कविता सादर करून समस्त महिला वर्गाच्या प्रश्नांना वाचा फोडली
सर्व रसिक प्रेक्षकांनी या कवितेला विशेष दाद दिली याप्रसंगी *कोळी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयेश अनंत तरे* यांचा विशेष सत्कार करण्यात आला या प्रसंगी उस्मानाबाद येथील लेखक व चळवळीतले कार्यकर्ते *सिद्धेश्वर कोळी यांची* मराठी साहित्य मंडळाची प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली व त्याचे नियुक्ती पत्र त्यांना *सुषमा शिरोमणि* यांच्या हस्ते देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *निवेदिका अनघा जाधव यांनी* केले. अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्याराष्ट्रीय *उपाध्यक्ष ललिता गवांदे* यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *