शिवराज्याभिषेक दिनी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सायकल वरून 32 किलोमीटरचा प्रवास करत रस्त्यात भेटेल त्या व्यक्तीस शिवराज्याभिषेकाचे महत्त्व दिले पटवून

लोकदर्शन 👉 राहुल खरात

जगाच्या पाठीवर महाराष्ट्रातील साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या कर्तृत्वाचा ठसा सर्वत्र उमटवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन हा लोक प्रबोधन दिन म्हणून साजरा करण्याचे आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी निश्चित केले.त्यात हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष असलेने आजच्या शिव राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी ३२ किलोमीटर सायकलवरून प्रवास करत रस्त्यात भेटेल त्या नागरिकाला शिवस्वराज्य दिनाबाबत संवाद करण्याचे ठरविले.त्यानुसार आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्य सरचिटणीस व पलूसच्या शिवाई प्रबोधन वाचनालयाचे संस्थापक हिम्मतराव मलमे सर, संघटनेचे सोशल मीडिया प्रमुख महेश मदने आणि प्रमुख सल्लागार सतिश नामदेव पाटील सर या पदाधिकाऱ्यांनी मिळून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त या उपक्रमाचे संयोजन केले. छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी तळागळातील काटक शूर धाडशी अठरा पगड जातीतील सवंगड्यांनी मदत केली. सहकार्य केले तसे देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुद्धा अठरा पगड जातीतील लोकांनी संघटीतपणे लढा दिला तेव्हा देश स्वतंत्र झाला.म्हणूनच चालू वर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील शिवराज्याभिषेक दिनी सकाळी लवकर उठून 32 किलोमीटर अंतर सायकलवरून प्रवास करणे आणि या सायकल प्रवासात शिवराज्याभिषेका बद्दल लोकांशी संवाद साधणे.व सध्याचे राज्य व छत्रपतींचे हिंदवी स्वराज्य याबाबत लोकप्रबोधन करण्याचा उपक्रम या पदाधिकाऱ्यांनी राबवला. आज ६जून२०२२ रोजी सकाळी पहाटे ठीक पाच वाजता ब्रिगेडचे हे पदाधिकारी पलूस येथील मुख्य चौकात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळयास मानवंदना करून सायकल प्रवासास निघाले.पलूस ते आंधळी फाटा, बलवडी फाटा पुढे बलवडी (भा.) गाव तेथून तांदळगाव ते आळसंद पर्यंत असा 16 किलोमीटरचा प्रवास करून हे पदाधिकारी आळसंद मध्ये पोहोचले. रस्त्यात भेटेल त्या व्यक्तीला आज शिवराज्याभिषेक दिन असून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस असल्याचे सांगत होते. आळसंद मध्ये हे पदाधिकारी आल्यानंतर तेथे आळसंदचे ज्येष्ठ नागरिक गुलाबराव शिरतोडे, ब्रिगेडचे राज्य निमंत्रक मारुती शिरतोडे व इतर मान्यवर नागरिकांनी या सायकलस्वार मावळ्यांचे स्वागत केले. आळसंदच्या वेशातील छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा, गावाची भव्य स्वागत कमान आणि भुईकोट किल्ला सारखा असणारा बुरुज अशा महत्त्वाच्या ठिकाणी असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले व घोषणा दिल्या. या ठिकाणी उपस्थित असणारे ब्रिगेडचे राज्य निमंत्रक कॉम्रेड मारुती शिरतोडे यांनी उपस्थितांना शिवराज्याभिषेक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले. तेथून या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सायकली वाझर रोडला वळवल्या व जवळच असणाऱ्या आळसंदचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी , क्रांतिसिंह नाना पाटलांचे सहकारी भाई भगवानराव सव्वाशे यांच्या स्मृती स्तंभास अभिवादन केले.त्यांचे सुपुत्र वेरळा विकास संस्थेचे अध्यक्ष दिलीप सव्वाशे यांची भेट घेऊन शिवराज्याभिषेक दिना बाबत संवाद साधला. पुढे हे पदाधिकारी सायकल वरून वाझर येथे आले आणि वाझर येथील शिवाजी महाराजांच्या वर मनापासून प्रेम करणारे वयोवृद्ध नागरिक, ज्यांनी आयुष्यात पैलवानकि करून भल्या भल्या पैलवानांना अस्मान दाखवले अशी ख्याती असणारे व एकेकाळी शंभर उसाची मोळी एकदम झटक्यात उचलून खांद्यावर घेणारे वाझर चे सुप्रसिद्ध पैलवान मल्हारी भैरु कांबळे यांची भेट घेऊन शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देऊन संवाद साधला. त्यानंतर आजच शिवराज्याभिषेक दिनी वाढदिवस असणारे वाझरचे शिवप्रेमी उपसरपंच हणमंतराव जाधव यांची ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली व त्यांना शुभेच्छा देऊन शिवराज्याभिषेक दिना बाबत संवाद साधला.तेथून हे पदाधिकारी आंधळी येथे सायकल वरून आले आणि आंधळी येथील छ. शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन करून लोकांशी संवाद साधला.अशा रीतीने पलूस ते आळसुंद आणि आळसुंद ते परत पलूस असा 32 किलोमीटरचा सायकलवरून प्रवास करून या प्रवासात रस्त्यात भेटणार्‍या लोकांशी शिवराज्याभिषेक दिनाचे महत्व सांगून त्यांच्याशी संवाद साधला आणि लोकप्रबोधन करत शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.आपल्या सायकलींना सुद्धा छत्रपतींचा भगवा झेंडा आणि सायकल चालवा आरोग्य सांभाळा सायकल चालवा प्रदूषण टाळा असे फलक लावून या पदाधिकाऱ्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले. आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमास अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *