शालेय विद्यार्थ्याना शैक्षणिक वस्तूंचे स्कूल किट वाटप. .. !

लोकदर्शन मुंबई-दादर (प्रतिनिधी – महेश्वर तेटांबे)

सेवा सहयोग फाऊंडेशन तर्फे ग्रामस्थ स्तरांवरील शाळेतील होतकरू विद्यार्थ्याना मोफत शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड आणि कणकवली तालुक्यातील गवाणे, नाद, वेळगिवे, दारुम, उंडील, बुरंबावडे, शिरवली, कोनेवाडी, वाघिवारे, शिडवने, तळे (खेड-रत्नागिरी), बुरंबाळ (कोल्हापूर) आदी शाळेतील सर्व विद्यार्थ्याना शैक्षणिक वस्तूंचे वाटप करून मुंबईस्थित ग्रामस्थानकडून पाठवण्यात आले. हा शैक्षणिक वस्तू वाटपाचा कार्यक्रम रविवार दिनांक २९ मे, रोजी सकाळी ११ ते दुपारी २ च्या सुमारास दादर येथील आय. ई.एस. या शाळेत संपन्न झाला. सेवा सहयोग फाऊंडेशनतर्फे हे शालेय वस्तूंचे किट गवाणे ग्रामविकास मंडळाकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी यावेळी गवाणे ग्रामविकास मंडळाचे पुरुषोत्तम मालणकर, संजय गवाणकर, सुनील तेली, महेश आयरे, जयवंत मालणकर, संतोष पांचाळ, बाळकृष्ण तांबे, सुधीर मोरे-खेड, वेदांत मालणकर, जयवंत गोरुले, थोटम, तळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. हे शालेय किट गावागावात पोहोचविण्यासाठी के. एम. एस. डॉ.शिरोडकर हायस्कूल च्या १९८८ सालातील दुपार अधिवेशनच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने श्रीकांत आयरे, विनोद तावडे, महेश्वर तेटांबे, राजेश मुणगेकर, संजय गवाणकर, सचिन पाटणकर यांनी सर्वतोपरी सहकार्य केले त्याचप्रमाणे मनोज आयरे आणि समीर गोरुले यांनीही आपली जबाबदारी पार पाडली. तसेच बुरंबाळ गावचे श्री सुनील पाटील, श्रीकांत भारमल आणि अरविंद गुरव ह्यांचा पण या कार्यास हात भार लागला

महेश्वर भिकाजी तेटांबे
(चित्रपट दिग्दर्शक, पत्रकार)
९०८२२९३८६७

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *