पुण्यश्लोक राजमाताअहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी करा- मा.श्री.देवेंद्र रामभाऊ थोटे

लोकदर्शन 👉 मोहन भारती

*⭕नागपूर जिल्हा उपाध्यक्ष : धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना, महाराष्ट्र राज्य

भारतातील तमाम अहिल्या भक्तांना आवाहन करतो की ३१ मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती येत आहे.प्रत्येक गावातील बांधवांनी व अनुयायांनी जयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी करावी.कोरोनाच्या काळात जयंत्या दोन वर्ष झाल्या नाहीत .यावर्षी प्रत्येक महापुरुषांच्या जयंत्या जोरदार साजऱ्या झाल्या आहेत. राजमाता अहिल्यादेवीचे विचार व कार्य जगासमोर आले पाहिजे व आपला इतिहासही समाजास समजला पाहिजे यासाठी प्रयत्न झाला पाहिजे .तसेच यातून समाजामध्ये वैचारिक प्रगल्भता वाढण्यास मदत होणार आहे.त्याबरोबर सरकारी परिपत्रकानूसार प्रत्येक शासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्यासाठी आपापल्या गावातील बांधवांनी व अनुयायांनी प्रयत्न केला पाहिजे .
राजमाता अहिल्यादेवी जयंतीदरम्यान चांगल्या लोकांची व्याख्याने आयोजित करा. त्यातून होळकरांचा इतिहास समोर येऊन समाज जागृती झाली पाहिजे .तसेच स्पर्धा परीक्षा, प्रबोधनपर, महिला जागृती, युवा प्रेरणा, आनंदी जीवन व मानव ,माणसानी जगावे कसे व कशासाठी ,शिक्षण – संस्कार आणि आजची तरुण पीढ़ी , युवकांनी उद्योजक बनावे इ.विषयी व्याख्याने आयोजित करा. 31मे रोजी प्रत्येकाने आपल्या घरी राजमाता यांच्या प्रतिमेचे पूजन करावे .गावात अथवा मंदिरात पुतळा असल्यास अभिवादन करावे.सर्वत्र सगळे जयंती ,महोत्सव निश्चितपणे मोठ्या प्रमाणात साजरी करतातच.पण या दिवशी वेगळा उपक्रम म्हणून सामाजिक कार्य अथवा दानधर्म करा.अहिल्यादेवीनी दानधर्म मोठ्या प्रमाणात केला. आपणही आपल्या व्यवसायातील नफ्याच्या 1%तरी दानधर्म करा. अहिल्यादेवीनी फार मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण करून झाडे जगवली.आज ऊनामुळे मनुष्य-प्राणी त्रस्त झाला आहे. त्यामुळे वृक्षरोपण करून झाडे जगवण्याचा प्रयत्न करा.शाळेमध्ये गोरगरीब मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करा .पशुपक्षी , निष्पाप जनावरे, शेळ्या , मेंढ्याची सेवा करा. गोरगरीब लोकांना अन्नदान करा .युवक -युवतीना सुरक्षाबाबत मार्गदर्शन करा. व्याख्यानमाला आयोजित करा इ. अशाप्रकारे जयंती साजरी झाल्यास आपला आदर्श अन्य समाज घेईल व समाजामध्ये वैचारिक प्रगल्भता वाढण्यास मदत होईल.
सणाप्रमाणे जयंती साजरी केली जाते. आपणही आपल्या घरासमोर रांगोळी काढून, होळकरशाहीचे “बांड” निशाण घरावर फडकवून जयंती साजरी , अहिल्यादेवी होळकर , महान लोकांची आत्मवृत्ते इ. पुस्तके वाचण्यास द्या. तसेच चौडी या ठिकाणी सहल आयोजित करा.अहिल्यादेवीच्या विचारांचे पोस्टर बनवून प्रबोधनपर मिरवणूक काढा .असे आव्हान मा.श्री.देवेंद्र रामभाऊ थोटे यांनी केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *