स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त 31 मे रोजी पंतप्रधान नरेंदभाई मोदी साधणार लाभार्थ्यांशी संवाद

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

*⭕प्रियदर्शिनी सभागृहात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन*

*⭕नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन*

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने केंद्र शासनाच्या वतीने देशभरात विविध उपक्रम राबवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. देशातील कोणताही नागरिक विकासापासून वंचित राहू नये व त्याच्या विविध गरजा सर्वसमावेशक आणि एकत्रितपणे पूर्ण होण्यासाठी शासनाने लाभार्थ्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. याच अनुषंगाने 31 मे 2022 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे हिमाचल प्रदेशातील शिमला येथून आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाद्वारे निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर शहरातील प्रियदर्शीनी सभागृहात करण्यात आले आहे.

पंतप्रधानांच्या शिमला येथील कार्यक्रमाशी जिल्ह्याला जोडले जाणार असून पंतप्रधानांचा परिसंवाद कार्यक्रम दोन भागांमध्ये आयोजित केला जाईल. संवादाचा पहिला भाग जिल्हा कार्यक्रमाच्या स्वरुपात सकाळी 10.15 वाजता सुरू होऊन सकाळी 10.50 वाजता कार्यक्रमाचा समारोप होईल. या प्रसंगी पीएम किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता देखील लाभार्थ्यांना हस्तांतरीत केला जाईल. संवादाच्या दुस-या भागात निवड केलेल्या जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांशी पंतप्रधान व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे आभासी संवाद साधतील.

या योजनांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण व शहरी), प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण व शहरी), जलजीवन मिशन आणि अमृत योजना, प्रधानमंत्री स्व निधी योजना, एक राष्ट्र एक राशनकार्ड योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, आयुष्यमान भारत पीएम जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत हेल्थ ॲन्ड वेलनेस सेंटर आणि प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा समावेश आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *