नांदाफाटा येथील यशोधन विहारसाठी घेण्यात आलेला ठरावच बोगस ,,,,,,,,,,,, सह्या केलेले १३ पैकी ११ सदस्य अनभिज्ञ।   

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,
⭕गरिबांना पाणी नाही मात्र बिल्डरला मुबलक
,,,,,,,,,,,,,
गडचांदूर-
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नांदा ग्रामपंचायतीने यशोधन विहार या खाजगी सदनिकेला पाणी पोहोचवून बिल्डरला लाखो रुपयांचा फायदा करून देणारा ठराव घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
एरवी एखाद्या ठिकाणी नळ जोडणी देण्याकरिता टाळाटाळ करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी चक्क ११ लक्ष रुपयांची पाईपलाईन यशोधन विहारकरिता टाकली. जेव्हा की त्या ठिकाणी वस्ती नाही आणि लाभार्थी पण नाही. यशोधन विहारकडून जाहिरातबाजी करून सदनिका विक्रीचे काम सुरू आहे. सर्व सुविधा उपलब्ध करून द्यायची जबाबदारी सदनिका मालकाची असताना ग्रामपंचायतच्या पैशातून यशोधन विहारला पाणी पोहचवून शासकीय पैशांचा अपव्यय करण्यात आला आहे. यासाठी ग्रामपंचायतने ठराव घेऊन ५ लक्ष ५० हजार लिटर पाणी व स्वच्छतेचा सोईचा ठराव घेण्यात आला. मात्र ग्रामपंचायत सदस्यांना विचारणा केली असता बहुतांश सदस्यांच्या मतानुसार हा ठरावच बोगस असल्याचे निदर्शनास येत आहे.

सह्या केलेले १३ पैकी ११ सदस्य अनभिज्ञ

ग्रामपंचायत मासिक सभेत यशोधन विहार येथील पाणी पुरवठा व स्वच्छता करण्याबाबत ठराव घेण्यात आला. यात १३ सदस्यांची उपस्थिती होती. त्यांची ठरावावर स्वाक्षरी देखील आहे. सभेला उपस्थित १३ सदस्यांपैकी सरपंचासह ११ सदस्यांनी यशोधन विहारला पाणीपुरवठा व साफसफाई करण्याचा ठराव सभेत आलाच नाही असे मत व्यक्त केले. त्याबद्दल ते अनभिज्ञ आहे. त्यामुळे ठराव झालाच कसा हा प्रश्न आहे.

गरिबांना पाणी नाही मात्र बिल्डरला मुबलक
गावातील गरीब नागरिकांनी अनामत रक्कम न भरल्याने ४५० नळ कनेक्शन कापण्यात आले. त्यांना आता पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. एकीकडे गरिबांना पाणी नाही मात्र दूसरीकडे बिल्डरला खूष करण्यासाठी मुबलक पाणी देवून आपला हेतू साध्य करण्याचे काम ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केले आहे आहे.

जिथे वस्तीच नाही तिथे लाखोचा खर्च कशासाठी?
११ लाख रूपये खर्च करून यशोधन विहारकडे पाईपलाईन टाकण्यात आली. परंतू तिकडे अजून वस्तीच नाही. आणि लाभार्थी पण नसतांना पाईपलाईन टाकून लाखों रुपये खर्च केवळ बिल्डरला लाभ मिळवून देण्यासाठी करण्यात आला आहे.

आर्थिक उलाढालाची शंका

सभेत सदस्यांच्या सह्या घेताना विषय आणला नाही आणि सह्या घ्यायच्या अगोदर ठरावामध्ये जागा सोडून ठेवली. आणि सदस्यांच्या सह्या झाल्यानंतर असा ठराव घेण्यात आला जो पूर्णपणे चुकीचा आहे. त्यामध्ये फार मोठे आर्थिक हितसंबंध असल्याचे दिसते.

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गावातील नागरीकांनाच पाण्याचा नियमित पुरवठा होत नाही तर यशोधन विहारला ५.५० लक्ष लीटर पाणी दररोज देण्याचा बनावट ठराव करुन दिला जातो. शोधन विहारची मालकी असणाऱ्या बिल्डरच्या शाळेवर नोकरी करणार्‍या एका ग्रामपंचायत सदस्याने गावकर्‍यांची दिशाभूल करून श्रीवास्तव ऍण्ड कंपनीला खूश करण्यासाठी खोटा ठराव तयार करून दिला आहे.
– प्रिया राजगडकर
माजी सदस्य, ग्रामपंचायत नांदा
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
यशोधन विहारकरिता ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी आपले सदस्यत्वचा गैरवापर करत पाणी पुरवठा करण्याचा ठराव सभेमध्ये न ठेवता संगनमताने परस्पर बनवून दिला आहे. माझ्यासमोर असा कुठलाही ठराव वाचून दाखविला नाही व समंतीही घेतली नाही –
घागरु कोटनाके, माजी सरपंच, ग्रामपंचायत नांदा
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *