म.न.पा. व सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे व दुरुस्ती कामे थांबवा :- कामगार सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकदर्शन👉मोहन भारती

*सोलापूर दिनांक :- १९/०५/२०२२ :-* सोलापूर शहर व जिल्ह्यातील तालुका पातळीवर करण्यात येणाऱ्या म.न.पा. भांडवली निधी अंतर्गत रस्ता व सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत निविदाव्दारे काढण्यात आलेल्या विविध दुरुस्ती कामे त्वरीत थांबवा. अन्यथा तीव्र आंदोलन करू अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मा. जिल्हाधिकारी यांना विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली मा. जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापूर महानगर पालिकेच्या भांडवली निधीतून त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर आणि उजणी कालवा विभाव क्र. ८ सोलापूर यांचे कार्यालयमार्फत सोलापूर शहर व तालुक्यातील विविध कामाची यामध्ये घटारी, रस्ते, संरक्षण भिंती, ध्वजारोहन, औज पोल, बांधकाम नालामोरी, गुरासाठी पाण्याचे उगड्या गटारी, बस थांबा, डांबरी रस्ते, स्मशान भूमी, ग्रामपंचायती कार्यालय इमारत, उर्दु घर फर्निचर अशा विविध दुरूस्ती व इतर कामांची निविदा प्रसिध्दीस झाल्या आहेत. म्हणजेच वरील सर्व कामे पुढील काही दिवसात होणार आहेत. असे या निविद्यावरून समजते.
महोदयांना आमच्या संघटनेच्या वतीने विनंती करण्यात येते की, महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोगाने सर्वोच्च न्यायालयांच्या आदेशानुसार अवघ्या काही दिवसातच निवडणुका घेण्याचे प्रयत्न व हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर येणारा ऋतू हा पावसाळी ऋतू असून पावसामुळे कुठलेही दुरूस्ती व रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे होणार नाहीत आणि त्याचा उपयोग ही ज्या उद्देशासाठी करतो तो साध्य होणार नाही. म्हणजेच शासनाचा पैशाचा नुकसान होणार आहे. म्हणून वरील कामे करून देखील काहीही उपयोग होणार नाही. आणि सर्वच राजकीय पक्ष केलेल्या कामाचा श्रेय लाटण्याचा पयत्न करतात. यामुळे ऐन निवडणुकीत शांतता भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी माननीयांनी वरील सर्व बाबींचा गंभीरतेने विचार करून प्रसिध्दीस दिलेल्या निविदा कामांना स्थगिती द्यावी. ही नम्र विनंती. अन्यथा शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. कृपया याची नोंद घ्यावी. असे नमूद केले.
*सदर निवेदनाचे प्रत १. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई. २. मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई. ३. मा.नगरविकासमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई. ४. मा. महसुलमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई. ५. मा. अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई. ६. मा. विभागीय आयुक्त, सहाय्यक पुणे विभाग, पुणे. ७. मा. आयुक्त साहेब, सो.म.पा. सोलापूर. ८. मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद, सोलापूर.* यांना पठविण्यात आले.
विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात गणेश म्हंता, विठ्ठल कुऱ्हाडकर, गुरूनाथ कोळी, संजीव शेट्टी, रमेश चिलवेरी, हणमंतु जाधव यांचा समावेश होता.
*●◆■★●◆◆★●◆■★●◆■★◆■*
*फोटो मॅटर :- सो.म.न.पा. व सोलापूर सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत ई निविदेव्दारे करण्यात येणाऱ्या रस्ता व दुरुस्ती कामे रद्द करावे. अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी शमा पवार यांना देतांना विष्णु कारमपुरी (महाराज) व कामगार सेना पदाधिकारी दिसत आहेत.*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *