माजी नगराध्यक्ष अरुण धोटेंच्या हस्ते रिया लेखराजानीचा सत्कार.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून रिया ला ६ सुवर्णपदक.

राजुरा (ता.प्र) :– लेखराजानी कुटुंबियांनी मागील अनेक वर्षांपासून राजुरा येथे विविध व्यवसायातून नावलौकिक मिळविला आहे. मात्र अशा व्यापारी कुटुंबातील, राहुल ट्रेडर्स चे संचालक सुनिल लेखराजानी यांची कन्या कु. रिया हिने एम.बी.ए.(फायनान्स) या विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातून ६ सुवर्पदक पटकावून नावलौकिक प्राप्त केला आहे. याबद्दल पुणे येथे राज्याचे उच्च व तन्त्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राष्ट्रीय मुल्यांकन आणी मान्यता परिषदेचे अध्यक्ष डॉ.भुषण पटवर्धन, पुणे विधापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर व मान्यवरांच्या हस्ते ६ सुवर्णपदक देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले होते. कु रिया हिने शालेय शिक्षण इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूलची राजुरा येथे पुर्ण केले होते हे विशेष. तीच्या या यशाबद्दल राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी तीच्या निवासस्थानी भेट देऊन कु. रिया हिचा सत्कार व कौतुक केले. तीचे व तीच्या पालकांचे अभिनंदन केले. तीला पुढील यशस्वी वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, सं गां नि योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, सुरेश लेखराजानी, सोनू लेखराजानी आदींची उपस्थीती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *