नागरिकांना पाणी टंचाई भेडसावू देऊ नका : आढावा बैठकीत आमदार सुभाष धोटे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

लोकदर्शन 👉 मोहन भारती

🔶आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते डेमो हाऊस चे लोकार्पण, वस्तू विक्री केंद्राचे उद्घाटन.

कोरपना :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली राजुरा विधानसभा क्षेत्रातील कोरपना तालुक्यातील पाणी प्रश्नावर संबंधित अधिकारी आणि नागरिक यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या तर त्यावर लवकर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी तसे निर्देश आमदार सुभाष धोटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पंचायत समिती कोरपना अंतर्गत डेमो हाऊस चे लोकार्पण आणि उमेद महिला बचत गट येरगवान, परसोळा यांच्या विद्यमाने आयोजित महिला बचत गटाच्या वस्तू विक्री केंद्राचे उद्घाटन सुध्दा पार पडले.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे म्हणाले की अन्न, वस्त्र निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. शुध्द आणि मुबलक प्रमाणात पाणी हे प्रत्येकांना आवश्यक आहे. तेव्हा सर्वांना आवश्यक पाणी पुरवठा उपलब्ध करून देणे आम्ही लोकप्रतिनिधी आणि सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे हे कर्तव्य आहे. नागरिकांनी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींनी सांगितलेल्या समस्या, सुचवलेले उपाय लक्षात घेऊन तातडीने उपाय योजना करण्यात याव्यात अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
या प्रसंगी तहसीलदार महेंद्र वाकलेकर, गटविकास अधिकारी दिलीप बैतलवार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता खोब्रागडे, गणेश भुसारी, उप अभियंता माथनकर, कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव थिपे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयराव बावणे, जि प सदस्या कल्पनाताई पेचे, माजी जि प सदस्य उत्तमराव पेचे, जेष्ठ कार्यकर्ते सुरेश मालेकर, सं गां नि योजनेचे अध्यक्ष उमेश राजूरकर, माजी सभापती श्यामभाऊ रणदिवे, माजी उपसभापती संभाजी कोवे, उमंग महिला प्रभाग संघाच्या महिला यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *