लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून कल्याण काॅलेज आॅफ नर्सिंग राजुरा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात पोस्टर स्पर्धा, भाषण स्पर्धा, लघु नाट्य स्पर्धा तसेच कॅरम, चेस स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या इन्फंट जिजस सोसायटी राजुराचे संचालक अभिजित धोटे, बी. एस्सी. नर्सिंग काँलेजचे प्राचार्य संतोष शिंदे, ए. एन. एम व जी. ए. एन. एम च्या प्राचार्या पुजा गीते, सर्व प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.