महाराष्ट्र कामगार सेना व लायन्स क्लब ट्रस्टच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

*सोलापूर दिनांक :- १२/०५/२०२२ :-* लायन्स क्लब ऑफ सोलापूर चॅरिटेबल ट्रस्ट व शिवसेना प्रणित महाराष्ट्र कमगार सेनेच्या वतीने गोर गरीब कामगार व गरजूना मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन कामगार सेना कार्यालय (पद्मशाली चौक) येथे करण्यात आले.
प्रारंभी नेत्र तपासणी शिबीराचे उद्घाटन जेष्ठ कलावंत श्री. वामनराव बावळे सर यांच्या हस्ते व महाराष्ट्र कामागार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलतांना कारमपुरी (महाराज) म्हणाले की, गरीब विडी कामगार, यंत्रमाग कामगार व गरजूनां मोफत नेत्र तपासणी शिबीर करणे हे सध्या समाजात अत्यंत गरजेचे आहे. शरीरातील सर्व अवयवापेक्षा मुख्य अवयव म्हणजे नेत्र. नेत्रावर तपासणी व उपचार करणे हे अशा या अति महत्वाच्या नेत्रावर तपासणी व उपचार करणे हे प्रमुख समाजसेवा आहे. यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेने केलेल्या विनंती नुसार व जेष्ठ कलाकार वामनराव बावळे सर यांच्या अतक प्रयत्नाने तसेच लायन्स क्लबचे महासिध्द ममाने नेत्र सहाय्यक, रमेश देशपती, सुरज जाधव जन संपर्क अधिकारी, मल्लिकार्जुन धुत्तरगी सहाय्यक या सर्वांच्या सहकार्याने सदर नेत्र तपासणी शिबीर यशस्वी झाली आहे. त्याबद्दल आभार मानले.
सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुमारे 100 लोकांनी सदर शिबीराचे लाभ घेतले.
सदर प्रसंगी दशरथ नंदाल, विठ्ठल कुऱ्हाडकर, शोभा पोला, गुरूनाथ कोळी, गणेश म्हंता, राधा आवार आदिंनी विशेष परिश्रम घेतले. *********************************
*फोटो मॅटर :- लायन्स क्लब व महाराष्ट्र सेनेच्या वतीने कामगार सेना कार्यालयात मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. सदर उद्घाटन प्रसंगी विष्णु कारमपुरी (महाराज), वामनराव बावळे, दशरथ नंदाल, विठ्ठल कुऱ्हाडकर यांच्यासह आदि दिसत आहेत.*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *